Talegaon News : दुचाकीला साईड न दिल्याने अल्पवयीन मुलाला मारहाण

एमपीसी न्यूज – दुचाकीला साईड दिली नाही म्हणून तीन तरूणांनी एका अल्पवयीन मुलाला मारहाण केली. तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या गार्डनजवळ शुक्रवारी (दि.25) सायंकाळी पाच वाजता ही घटना घडली. याप्रकरणी दोन आरोपी तरूणांना तळेगाव दाभाडे पोलिसांनी अटक केली आहे.

अर्थव शशिकांत शिंदे (वय 17, रा. तळेगाव दाभाडे, मावळ) याने याबाबत तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अतुल रमेश सोनवणे उर्फ पहलवान (वय 21, रा. खंडोबा मंदीर जवळ, तळेगाव दाभाडे) आणि आशुतोष संतोष गरूड (वय 19, रा. भेगडेआळी) या दोघांना अटक केली आहे. तसेच, आरोपी गड्डी (वय 20) फरार आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मुलगा अर्थव तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या गार्डनजवळून जात होता. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या आरोपींना साईड न दिल्याने त्यांना राग आला. आरोपींनी अर्थवला बुक्कीने मारहाण केली. तसेच, हत्यार पाठीत मारून जखमी केले, असे फिर्यादीत म्हंटले आहे. याबाबत दोघांना अटक केली असून, तळेगाव दाभाडे पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.