Chinchwad News : लग्नाचे आमिष दाखवून महिलेच्या नावे घेतले पर्सनल लोन, महिलेची 7.50 लाखाची फसवणूक

एमपीसी न्यूज : लग्नाच्या आमिषाने महिलेच्या नावे 5.50 लाख रूपयांचे पर्सनल लोन घेतले, तसेच क्रेडीट कार्डद्वारे दीड लाख रुपयांचा वापर केला. अशी एकूण 7.50 लाख रुपयांची महिलेची फसवणूक केली. जुलै 2021 ते 25-03-2022 या कालावधीत चिंचवड येथे ही घटना घडली.

महिलेने चिंचवड पोलीस ठाण्यात शुक्रवारी (दि.25) दिलेल्या फिर्यादीवरून अकुल पटेल उर्फ अखिलेश गुर्जर याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने स्वत:च्या नावाची ओळख लपवून, फिर्यादी यांना लग्नाचे आमिष दाखवले.आरोपीने फिर्यादी आणि त्यांच्या पालकांचा विश्वास संपादन केला.फिर्यादीचे डेबिट कार्ड वापरून त्याद्वारे 5 लाख 50 हजार रूपयांचे पर्सनल लोन काढले तसेच, क्रेडीट कार्डद्वारे दीड लाख रूपयांचा वापर केला. अशी फिर्यादी यांची एकूण 7 लाख 50 हजार रूपयांची फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. चिंचवड पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.