Talegaon : टेम्पोच्या धडकेत एकाचा मृत्यू व एकजण जखमी

एमपीसी न्यूज –  इंदोरी गावच्या हद्दीत एका टॅम्पोने विरुद्ध दिशेने येत (Talegaon) दुचाकीला जोरदार धडक दिली. यामध्ये एकजण गंभीर जखमी झाला आहे; तर एकाचा मृत्यू झाला आहे.हा अपघात 25 जुलै रोजी तळेगाव-चाकण रोडवर झाला.

यामध्ये सुरेश होनाजी दाभाडे (वय 29 रा.इंदोरी) या तरुणाचा मृत्यू झाला असून गिताराम कल्याण सोनावणे (वय 35 रा. इंदोरी) हे जखमी झाले आहेत. याप्रकऱणी अरुण मधुकर दाभाडे यांनी सोमवारी (दि.31) तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीवरून टॅम्पो एमएच 14 डीएम 9513 चा चालक याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

Pimpri : शिक्षण आणि जात प्रतिभेला रोखू शकत नाही. याचे उदाहरण म्हणजे अण्णाभाऊ साठे होय – ॲड रानवडे

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने त्याच्या ताब्यातील टॅम्पो हा भरधाव वेगात विरुद्ध दिशेने चालवत नेला. यावेळी त्याने समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यात दुचाकीवरील सोनवणे गंभीर जखमी झाले तर दाभाडेचा यात मृत्यू झाला. यावरून चालकावर गुन्हा दाखल केला असून तळेगाव एमआयडीसी पोलीस पुढील तपास करत (Talegaon) आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.