Pimpri : शिक्षण आणि जात प्रतिभेला रोखू शकत नाही. याचे उदाहरण म्हणजे अण्णाभाऊ साठे होय – ॲड रानवडे

एमपीसी न्यूज – साहित्यरत्न, क्रांतिकारक, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिभेला जात – पात , दारिद्रय तसेच शिक्षण रोखू शकले नाही.  हा भारतभूमीवरील चमत्कार म्हणावा लागेल, असे प्रतिपादन मराठा सेवा संघाचे पिंपरी (Pimpri) चिंचवड शहर अध्यक्ष ॲड लक्ष्मण रानवडे यांनी केले.

Wakad : गाडी वॉशचे पैसे मागितले म्हणून वॉशिंग सेंटर चालकाला मारहाण 

अण्णाभाऊ साठे यांच्या १०३ व्या जयंतीनिमित्त निगडी येथील त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करतेवेळी ते बोलत होते. अण्णाभाऊंनी प्रचलित विषम समाज व्यवस्थेविरुद्ध लिखाण केले . त्यात कथा , कादंबऱ्या, वगनाट्य ,प्रवास वर्णन , गीते , लावण्या, पोवाडे असे विविध प्रकारचे साहित्य निर्माण केले.

भांडवलशाही धोरणाविरुद्ध पेटून उठत त्यांनी कामगारांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात लढे उभे केले. वास्तविक अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्नच मिळायला हवा परंतू शासन व्यवस्थेने किमान मुंबई अथवा शिवाजी विद्यापीठा तर्फे त्यांचा मरणोत्तर डिलीट पदवी देऊन सन्मान करावा असे रानवडे  पुढे म्हटले.

१९६० साली महाराष्ट्र व गुजरात ही दोन राज्ये निर्माण करीत असताना मुंबई महाराष्ट्रापासून तोडून गुजरातला जोडण्याचा डाव आखला जात होता. त्या विरोधात अण्णाभाऊंनी आपल्या शाहिरीने मुंबईतील कामगार तसेच महाराष्ट्रात गावोगावी जाऊन शेतकऱ्यांना आपल्या पोवाडयांतून संयुक्त महाराष्ट्राचा लढा उभारण्यास प्रवृत्त केले. महाराष्ट्रापासून मुंबई तोडण्याचा डाव उधळून लावण्यात सिंहाचा वाटा उचलला असल्याचे ॲड लक्ष्मण रानवडे यांनी म्हटले.

या कार्यक्रमास मराठा सेवा संघाचे कार्याध्यक्ष वाल्मिकी माने , सचिव सचिन दाभाडे , उपाध्यक्ष प्रकाश बाबर, तुकोबाराय साहित्य परिषेदेचे अध्यक्ष गोविंद खामकर , जिजाऊ संघटनेच्या अध्यक्षा सुनीता शिंदे व उपाध्यक्षा माणिक शिंदे, अशोक सातपुते, अँड सुनील रानवडे, विजय शिंदे, दिलीप वाघ  त्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.