Talegaon : परस्पर जमीन मोजणी करणाऱ्या भूमिअभिलेख कार्यालयातील प्रकाश धादवडेंची चौकशी करावी; ज्येष्ठ महिलेची मागणी

एमपीसी न्यूज – जमीन मालकाला कोणतीही (Talegaon) पूर्वकल्पना न देता जमिनीची मोजणी करत ज्येष्ठ महिलेशी उद्धटपणे वागणूक करणाऱ्या भूमि अभिलेख कार्यालयातील अधिकारी प्रकाश धादवडे यांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी ज्येष्ठ नागरिक सुनंदा बाळकृष्ण माहुलकर यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख व पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्याकडे केली आहे.

सुनंदा माहुलकर यांनी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, भूमिअभिलेख कार्यालयात प्रकाश धादवडे यांनी 10 जुलै रोजी कोणतीही पूर्वकल्पना किंवा पूर्वसूचना न देता माझ्या खाजगी मालमत्तेमध्ये काही इसमांना घेऊन मोजणी करीता प्लॉटमध्ये आले.

त्यांनी मला पहिले मी रेल्वे कर्मचारी असल्याचे सांगितले व मी आपली जमीन मोजण्याकरिता आलेलो आहे, असे सांगितले व सोसायटीतील काही लोकांना बोलवून तिथे बेकायदेशीरपणे जमाव केला व माझ्यावर एका ज्येष्ठ नागरिकावर दबाव यंत्रणेचा वापर करुन माझी वैयक्तिक जमीन मोजणी करुन घेतली.

तसेच त्यांना मी वारंवार खडसून विचारले असता त्यांनी असे सांगितले की, मी भूमिअभिलेख कार्यालयातील एक अधिकारी आहे व मला नारायणशेठ सोलंकी व त्यांचा मुलगा भावेश सोलंकी यांनी पाठविलेले आहे व आपली जमीन मोजण्यासाठी मला सांगितले आहे.

माझी कुठलीही परवानगी न घेता व मला कोणतीही पूर्वसूचना व (Talegaon) कल्पना व कार्यालयीन नोटीस न देता माझ्या खाजगी मालमत्तेवर कसे काय आले, याची चौकशी करण्यात यावी. त्यांच्या बँक खात्याचीही चौकशी करण्यात यावी व ते कोणाच्या सांगण्यावरुन आले याचीसुद्धा चौकशी करण्यात यावी.

तसेच त्यांचे कॉल डिटेल्स, रेकॉर्ड सुद्धा चेक करण्यात यावे. त्यांनी कोणाच्या सांगण्यावरुन हे बेकायदेशीरपणे कृत्य केले आहे याची सखोल चौकशी करण्यात यावी. तसेच त्यांच्यावर आपल्या माध्यमातून गुन्हा दाखल करण्यात यावा. अन्यथा आम्ही आपल्या कार्यालयापुढे सर्व माहुलकर कुटुंबीय आंदोलन करणार आहोत.

त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अन्यथा त्यांना निलंबित करण्यात यावे. मी घरी एकटी असताना मी एक ज्येष्ठ नागरिक असून मला गुडघ्यांचा त्रास आहे. तसेच मला जास्त दिसत नाही असे असताना देखील वरील नमूद इसम याने मला न सांगता माझ्या खाजगी मालमत्तेमध्ये प्रवेश केला.

Pune : दणदणीत विजयासह लॉयला प्रशालेची आगेकूच

त्यांनी नारायण सोलंकी व त्यांचा मुलगा भावेश सोलंकी यांनी मला असे सांगितले की आपली जागा सेलडिड केलेली आहे असे असल्यास मला सेलडिडचे झालेल्या व्यवहाराचे संपूर्ण कागदपत्रे का दाखविली नाही, याची सुद्धा सखोल चौकशी करण्यात यावी.

प्रकाश धादवडे ही व्यक्ती नेमकी सरकारी व्यक्ती आहे का, बिल्डरांची मुजोरी करणारी व्यक्ती आहे, याचा तपास आपणच (Talegaon) लावावा व सदर व्यक्तीचे निलंबन करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी निवेदनात केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.