Talegaon : मुख्य आरोपीच्या अटकेसाठी सुलोचना आवारे यांचे लाक्षणिक उपोषण; पोलीस आयुक्तांना निवेदन

एमपीसी न्यूज – जनसेवा विकास समितीचे संस्थापक (Talegaon ) अध्यक्ष किशोर आवारे यांच्या हत्येला एक महिन्याचा कालावधी उलटला. हत्या करणारे आरोपी आणि हत्येच्या कटातील सहभागी असलेल्या सहा जणांना पोलिसांनी आतापर्यंत अटक केली आहे. यातील सूत्रधार अद्याप फरार असून त्याच्या मागावर पोलिसांनी दोन पथके रवाना केली आहेत. दरम्यान किशोर आवारे यांच्या आई माजी नगराध्यक्षा सुलोचना आवारे यांनी तपास गतीने करण्याच्या मागणीसाठी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केले. तसेच त्यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेतली.

किशोर आवारे हत्या प्रकरणात गौरव भानू खळदे (रा. तळेगाव), शाम अरुण निगडकर (वय 46, रा. डोळसनाथ आळी, तळेगाव दाभाडे), प्रवीण संभाजी धोत्रे (वय 32), आदेश विठ्ठल धोत्रे (वय 28, रा. नाणे, ता. मावळ), संदीप उर्फ नन्या विठ्ठल मोरे (वय 32, रा. आकुर्डी), श्रीनिवास उर्फ सिनु व्यंकटस्वामी शिडगळ (रा. देहूरोड) या सहा जणांना अटक करण्यात आली आहे.

बांधकाम साईटवर बेकायदेशीरपणे झाडे तोडल्याच्या संशयावरून किशोर आवारे आणि भानु खळदे यांचा मागील वर्षी तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या कार्यालयात वाद झाला. यामध्ये किशोर आवारे यांनी भानू खळदे याच्या कानशिलात लगावली. त्या रागातून भानू खळदे याचा मुलगा गौरव याने किशोर आवारे यांची हत्या घडवून आणण्याचा कट रचला. त्यासाठी त्याने आरोपींना सुपारी दिली. त्यातून 12 मे रोजी दुपारी चार जणांनी किशोर आवारे यांच्यावर नगरपरिषदेच्या कार्यालयासमोर हल्ला करून त्यांची हत्या केली.

Cyclone Biparjoy : बिपारजोय चक्रीवादळ गुजरातेतील जखाऊ बंदराला धडकण्याची शक्यता

दरम्यान पोलिसांनी सहा जणांना अटक केली. त्यामध्ये हत्या करणारे चार जण, त्यांना मदत करणारा एक आणि आरोपींना सुपारी देणाऱ्या एकाचा समावेश आहे. घटना घडल्यानंतर भानू खळदे पळून गेला. या हत्या प्रकरणाला एक महिन्याचा कालावधी उलटला आहे. मुख्य आरोपीच्या अटकेसाठी किशोर आवारे यांच्या आई माजी नगराध्यक्षा सुलोचना आवारे यांनी मंगळवारी (दि. 13) लाक्षणिक उपोषण केले. त्यांनी मंगळवारी दुपारी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांची भेट घेतली. पोलीस आयुक्तांनी आतापर्यंत झालेल्या तपासाची संपूर्ण माहिती आवारे यांना दिली.

दरम्यान, किशोर आवारे यांच्या खून प्रकरणामुळे मावळ परिसरामध्ये राजकीय वाद पेटला आहे. एक गट खुनाच्या घटनेमध्ये राजकीय वादातून काही लोकांची नावे गोवल्याचा आरोप करत आहे तर दुसरा गट वडिलांच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी हा खून घडवून आणल्याचा दावा करत आहे.

एसआयटीच्या मदतीला दिले आणखी एक पथक
किशोर आवारे यांच्या हत्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलीस आयुक्तांनी विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना केली. सुरुवातीला या पथकाच्या प्रमुख म्हणून सहायक पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे यांची नियुक्ती करण्यात आली. दरम्यान, कट्टे यांची बदली झाली. त्यानंतर एसआयतिचा कार्यभार सहाय्यक पोलीस आयुक्त विशाल हिरे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. गुन्हे शाखा युनिट पाच, गुंडा विरोधी पथक ही दोन्ही पथके तळेगाव दाभाडे येथे स्थलांतरित करण्यात आली आहेत. तसेच एसआयटीला अन्य एक पथक मदतीला देण्यात आले असल्याचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी सांगितले.

भानू खळदेच्या मागावर दोन पथके
अटक केलेला आरोपी गौरव खळदे याचे वडील भानू खळदे हा अद्याप फरार आहे. त्यामुळे त्याच्या मागावर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी दोन पथके रवाना केली असल्याचेही पोलीस (Talegaon ) आयुक्तांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.