Talegaon : दोन चिमुरडयांचे अपहरण करताना महिलेला अटक

एमपीसी न्यूज : एका 5 वर्षीय मुलाचे व 3 वर्षीय मुलीचे अपहरण (Talegaon) करत असताना आरोपी महिलेस तळेगाव दाभाडे पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत 23 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. या प्रकरणी एका महिला आरोपीला अटक करण्यात आली आहे. तिच्या विरोधात भादवि कलम 363, 511 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Hinjawadi : कासारसाई येथे प्लॉट खरेदीसाठी पैसे घेऊन गुंतवणूकदारांची 76.51 लाख रुपयांची फसवणूक

ही घटना 4 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास (Talegaon) गणपती चौक ते घोरवडी स्टेशनकडे जाणाऱ्या रोडवर घडली. महिला आरोपी फिर्यादीची 3 वर्षांची मुलगी तसेच फिर्यादीच्या शेजारी राहणाऱ्या महिलेचा 5 वर्षांचा मुलगा या दोघांना फुस लावून पळवून नेण्याचा प्रयत्न करत होती. पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी लगेचच या आरोपीला अटक करून दोन्ही लहान मुलांचे प्राण वाचवले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.