Chakan Accident : भरधाव वेगात येणाऱ्या दुचाकीची दुसऱ्या दुचाकीला धडक; दुचाकीस्वाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज : भरधाव वेगात येणाऱ्या दुचाकीने (Chakan Accident) दुसऱ्या दुचाकीला धडक दिल्याने एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना चाकण येथे घडली. हा अपघात 4 जानेवारी रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास कन्या शाळेसमोर घडला.

या अपघातात बाळासाहेब गवते (वय 57 वर्षे, रा. गवते वस्ती, चाकण) या दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे. तर, नीलेश पवार (वय 22 वर्ष, रा. बालाजी नगर, मेदनकरवाडी, चाकण) या आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Talegaon : दोन चिमुरडयांचे अपहरण करताना महिलेला अटक

सविस्तर माहिती अशी, की पुणे- नाशिक रोडवर कन्या शाळेसमोर (Chakan Accident) नीलेश पवार हा भरधाव वेगात आपली बाइक चालवत आला. या दरम्यान त्याने बाळासाहेब गवते याच्या दुचाकीला जोराची धडक दिली. या धडकेत बाळासाहेब या तरुणाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला. बाळासाहेब हा चक्रेश्वर मंदिर येथे जाऊन येतो असे सांगून घराबाहेर पडला होता. परंतु, त्याचा अपघातात मृत्यू झाला.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.