Tata Business News : टाटा मोटर्सच्या जुलै महिन्यात 54 हजार 119 गाड्यांची विक्री

एमपीसी न्यूज – टाटा मोटर्सने जुलै 2021 महिन्यातील आपला विक्री अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालानुसार टाटा मोटर्सच्या जुलै 2021 महिन्यात स्थानिक व आंतरराष्ट्रीय स्तरावर 54 हजार 119 गाड्यांची विक्री झाली आहे. तर, फक्त भारतात 51 हजार 981 गाड्यांची विक्री झाली आहे. जुलै 2020 च्या तुलनेत विक्रीत 92 टक्के वाढ झाली आहे.

कमर्शियल व्हेईकल विभागात हेव्ही कमर्शियल व्हेईकल 5 हजार 416, लाईट कमर्शियल व्हेईकल 3 हजार 357, पॅसेंजर कॅरिअर 825, कार्गो आणि पिक अप 12 हजार 198 आणि 2 हजार 052 कमर्शियल व्हेईकल निर्यात करण्यात आली आहेत. असे एकूण 23 हजार 848 कमर्शियल वाहनांची विक्री जुलै 2021 महिन्यात झाली आहे.

तसेच, पॅसेंजर व्हेईकल विभागात जुलै महिन्यात 30 हजार 185 गाड्यांची विक्री झाली असल्याचे अहवालात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.