Tathawade : दारू पाजण्याच्या भांडणात तरुणाला गळा दाबून ठार मारण्याचा प्रयत्न

एमपीसी न्यूज : दारू पाजण्याच्या कारणावरून झालेल्या (Tathawade) भांडणात दोघांनी एका तरुणाला मारहाण करत त्याचा गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना 5 ऑगस्ट रोजी रात्री पुनावळे, ताथवडे भागात घडली.

याप्रकरणी गुरुवारी  (दि.10) मिलन हरी विश्वकर्मा (वय 27, रा. ताथवडे) यांनी रावेत पोलिसांना फिर्यादी दिली आहे. यावरून पोलिसांनी भरत भीम बहादुर शाही (वय 29) व भरत करम बोहरा (वय 34, दोघे राहणार ताथवडे) यांना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून, नुसार फिर्यादी व आरोपी यांच्यात दारू पाजण्यावरून शाब्दिक भांडण झाले होते. यावेळी ताथवडे येथील एक मोकळ्या जागेत पायी चालत असताना आरोपींनी फिर्यादीला शिवीगाळ करून हाताने मारहाण केली.

Pimple Saudagar : पिंपळे सौदागर येथे स्पा सेंटरवर छापा दोन महिलांची सुटका

तसेच फिर्यादीच्या छातीवर बसून तुला आज जिवंत सोडत नाही म्हणत (Tathawade) गळ्यावर मानेवर बुक्क्या व नखाने ओरबडून गळा आवळून ठार मारण्याचा प्रयत्न केला. यात फिर्यादी जखमी झाले असून रावेत पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे.  पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.