Pimple Saudagar : पिंपळे सौदागर येथे स्पा सेंटरवर छापा दोन महिलांची सुटका

एमपीसी न्यूज : पिंपळे सौदागर येथील आर.जे. स्पा येथे पिंपरी चिंचवड पोलिसांच्या (Pimple Saudagar) अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाने छापा टाकला. ही कारवाई गुरुवारी सायंकाळी करण्यात आली.

याप्रकरणी वाकड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी एका महिलेला अटक केली आहे.

Sangavi : महिलेचा न्यूड व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत तीस हजारांना गंडा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिलाही दोन महिलांना पैशाचे आमिष देऊन स्पा व मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय करून घेत होत्या. पोलिसांना याची खबर मिळताच पोलिसांनी छापा टाकत आरोपी महिलेला अटक केली आहे.

तर दोन पीडित महिलांची सुटका केली आहे. वाकड पोलिसांनी या प्रकरणी (Pimple Saudagar) गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.