Pune : 13 ऑगस्ट रोजी हिंदू महासंघाची पहिली जाहीर सभा 

एमपीसी न्यूज – देशाची डबघाईला आलेली अर्थव्यवस्था, वाढलेले कर्ज, बेरोजगारी, प्रत्येक पावलावर (Pune) देशाचा होणारा अपमान, अशा अनेक मुद्द्यांवर केंद्रातील राज्यकर्त्यांना जाब विचारण्यासाठी हिंदू महासंघाने पुण्यात जाहीर सभेचे आयोजन केले आहे.
13 ऑगस्ट रोजी न्यू इंग्लिश स्कुल(टिळक रस्ता,पुणे)च्या गणेश सभागृहात सायंकाळी 6 वाजता ही सभा होणार आहे. हिंदू महासंघाची ही पहिलीच जाहीर सभा आहे. हिंदू महासंघाचे संस्थापक अध्यक्ष आनंद दवे हे या जाहीर सभेत मार्गदर्शन करणार आहेत. हिंदू महासंघाने आज प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात ही माहिती देण्यात आली आहे.
 ‘मै देश झुकने नही दूंगा, बिकने नही दूंगा’ असे सध्याच्या राज्यकर्त्यांनी सांगितले होते. पण, देश प्रत्येक पावलावर देशाला मान खाली (Pune) घालायला लागली आहे. देश बदलायला म्हणून आले होते आणि स्वतःच बदलले. आता राज्यकर्ते बुलेट ट्रेन, 15 लाख, शेतकऱ्यांचे दुप्पट उत्पादन,नवीन कॉलेजेस,स्मार्ट सिटी, घसरता रुपया,पेट्रोलचे भाव, 2 कोटी नोकऱ्यांवर बोलत नाहीत.

काश्मीर, चीन, पंजाब, अमेरिका, कैराणा, मेवात, हिमाचल, दिल्ली प्रत्येक पावलावर या राज्यकर्त्यांनी देशाचा अपमान केला आहे. हिंदूची मान खाली जात आहे,देशाची शान जात आहे.अशा परिस्थितीत जाब विचारण्यासाठी या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
नुकतीच काश्मीर पुनर्रचना विधेयकाच्या मुद्द्यावरून आणि काश्मिरी पंडितांच्या पुनर्वसनावरून हिंदू महासंघाने भाजपला आणि मोदी सरकारला पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत धारेवर धरले होते. या पत्रकार परिषदेला युथ ऑफ पनून काश्मीर’ संघटनेचे अध्यक्ष राजेश कौल खासकरून उपस्थित होते.
याच परिषदेत 13 ऑगस्ट ला होणाऱ्या मेळाव्याची आणि जाहीर सभेची घोषणा करण्यात आली होती. त्यामुळे पुण्यात सभेबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे.
हिंदू महासंघाच्या वतीने संस्थापक आनंद दवे यांनी कसबा विधानसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवारीने निवडणूक लढवली होती. लोकसभा निवडणुकीची तयारी सर्व राजकीय पक्षांनी सुरु केलेली असताना हिंदुत्वाच्या आणि देशहिताच्या मुद्द्यावर होणारी हिंदू महासंघाची (Pune) सभा महत्वपूर्ण मानली जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.