Sangavi : महिलेचा न्यूड व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत तीस हजारांना गंडा

एमपीसी न्यूज : सोशल मीडियावरून झालेल्या (Sangavi) ओळखीतून आरोपीने महिलेचा न्यूड व्हिडिओ काढला होता. तो व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत वेळोवेळी पैशांची मागणी करत महिलेची 30,000 रुपयांची फसवणूक केली आहे.

हा प्रकार 6 जुलै रोजी ऑनलाईन पद्धतीने झाला. या प्रकरणी पीडित महिलेने गुरुवारी (दि. 10) सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद  दिली आहे. फिर्यादीनुसार सांगवी पोलिसांनी या इंस्टाग्राम अकाउंट धारक व मोबाईल धारकावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी व पीडित महिला यांच्यातील इंस्टाग्राम वरून ओळख झाली. त्यांनी स्वतःचे मोबाईल नंबर शेअर करत ओळख वाढवली. पिडीतेचा विश्वास संपादन (Sangavi) करून फिर्यादीला व्हिडिओ कॉल करत त्यांचा न्यूड व्हिडिओ काढला.

Maval : जागतिक आदिवासी दिनानिमित्त रामदास काकडे यांच्यासह विविध मान्यवरांचा आदिवासी लोक मित्र पुरस्काराने सन्मान

पुढे हा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत महिलेकडून 29 जुलै ते 6 ऑगस्ट या कालावधीत वेळोवेळी असे ऑनलाईन पद्धतीने तीस हजार रुपये घेतले. त्रास सहन न झाल्याने महिलेने पोलिसांकडे धाव घेतली. सांगवी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.