Maval : जागतिक आदिवासी दिनानिमित्त रामदास काकडे यांच्यासह विविध मान्यवरांचा आदिवासी लोक मित्र पुरस्काराने सन्मान

एमपीसी न्यूज – मावळ मध्ये जमीन हक्क परिषद व आदिवासी भटका बहूजन संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या (Maval) संयुक्त विद्यमाने बुधवारी (दि. 9 ऑगस्ट) जागतिक आदीवासी दिन साजरा करण्यात आला. या दिवसाचे औचित्य साधून उद्योजक रामदास काकडे यांच्यासह समाजात निरपेक्ष तसेच सातत्याने काम करणा-या विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी दोन्ही संघटनाचे संस्थापक अध्यक्ष माऊली सोनवणे,तालुकाध्यक्ष ह.भ.प दिनकर शेटे,महासचिव चंद्रकात शिंदे,युवकाध्यक्ष जालिंदर गोंटे, महिलाध्यक्ष करूणा सरोदे, सुरेखा माडे,मिनाक्षी मोरे,मिनल ढगे, अशोक जाधव, पांडूरंग तुपे, राजू शिंदे,फरिदभाईशेख,राजू वरघडे  तानाजी गोळे,कांताराम भवारी, चंद्रकात सातकर, प्रावक्ता मिलिंद अच्युत , कार्याध्यक्ष योगेश पारगे , युग अध्यक्ष समीर दाभाडे ,सुनील गुजर इ. शेकडो कार्यकर्ते उपस्थित (Maval)  होते.

Pimpri : महाविद्यालयांमध्ये ‘विद्यार्थी सहाय्यता कक्ष’ सुरू करण्याची मागणी

पत्रकार क्षेत्रातील निर्भिड शोधपत्रकार साप्ताहिक निर्भिडचे संपादक कांतीलाल कडू तसेच तळेगाव नगरीचे उद्योजक रामदास काकडे, रक्तदान क्षेत्रातील योगदानात्मक काम असणारे संजय गायखे, मावळ तहसिलदार विक्रम देशमुख,आंतरराष्ट्रीय उद्योजक व विचारवंत प्रशांत चव्हाण, सांप्रदाय क्षेत्रातील क्षिरसागर महाराज आदींना आदीवासी लोकमित्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

शेवट ईरशाळवाडीतील बांधवांना व प्रा. हरी नरके यांना श्रद्धांजली वाहून राष्ट्रगीताने कार्यक्रमची (Maval)  सांगता झाली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.