PCMC : शहरात डेंग्यूचा डंख; डेंग्यूचे 51 रूग्ण

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरामध्ये डोळे येण्याच्या (PCMC) रुग्णांबरोबरच डेंग्यूचा डंखातही वाढ होत आहे. शहरातील 51 रुग्णांना डेंग्यूची लागण झाली आहे. जुलै महिन्यात 36 रुग्ण आढळले होते. गेल्या महिन्यापासून डेंग्यू रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे.

शहर आणि परिसरात जूनच्या शेवटच्या आठवड्यात पावसाला सुरूवात झाली. त्यामुळे जून महिन्यामध्ये शहरात एकही डेंग्यूचा रूग्ण आढळला नाही. मात्र, जुलैमध्ये सातत्याने पावसाची संततधार सुरू होती. त्यामुळे पावसाचे पाणी साचून डबकी तयार होतात. यामध्ये डेंग्यूचे डास आळ्या घालतात. त्यामुळे एडिस इजिप्ती या डासांचे प्रमाण वाढते.

जानेवारीपासून ताप आलेल्या 77 हजार 631 रूग्णांची तपासणी केल्यानंतर डेंग्यूचे 2 हजार 975 संशयित आढळून आले. त्यामध्ये 51 जणांना डेंग्यू झाल्याचे निदान झाले आहे. यामध्ये जुलै महिन्यात 36 जणांना डेंग्यूची लागण झाली होती. ऑगस्टच्या अवघ्या दहा दिवसात 15 जणांना डेंग्यूची लागण झाली आहे. डेंग्यूचे रूग्ण वाढत असल्याने प्लेटलेट्‌सचीही मागणी वाढू लागली (PCMC) आहे.

Pimple Saudagar : पिंपळे सौदागर येथे स्पा सेंटरवर छापा दोन महिलांची सुटका

डेंग्यूची लक्षणे

  • तीव्र ताप, तीव्र डोकेदुखी
  • स्नायुदुखी व सांधेदुखी
  • उलट्या होणे, डोळ्यांच्या आतील दुखणे
  • अंगावर पुरळ, अशक्तपणा, भूक मंदावणे, तोंडाला कोरड पडणे

महापालिकेचे काळजी घेण्याचे आवाहन

  • डेंग्यूचे डास स्वच्छ पाण्यात अंडी घालतात. त्यामुळे घराजवळील परिसरात पाणी साचणार नाही, याची काळजी घ्यावी.
  •  घराच्या छतावरील किंवा फ्लॅटच्या तळघरात असलेली पाण्याची टाकी झाकण लावून बंद ठेवावी.
  •  फ्लॉवरपॉट, कुलर व फ्रीजच्या खालच्या ट्रेमधील पाणी दर आठवड्याला रिकामे करावे.
  •  घराच्या मागच्या अंगणातील किंवा गच्चीवरील भंगारमालाची विल्हेवाट (PCMC) लावावी.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.