Mahavitaran : धार्मिक स्थळांसाठी वीजदराबाबतचा तो संदेश खोटा – महावितरण

एमपीसी न्यूज – समाज माध्यमांवर बुधवारी, दि.24 वीजदराबाबतचा एक संदेश सर्वत्र मोठ्या प्रमाणात फिरत होता. या संदेशात महावितरणचे (Mahavitaran) वीजदर हे सामान्य नागरिक, मश्जिद, चर्च आणि मंदिरासाठी वेगवेगळे असल्याचा दावा करण्यात आला आहे.

Pawana Dam : पवना धरणात 28 टक्के पाणीसाठा

समाज माध्यमांवरील हा संदेश दिशाभूल करण्यासोबतच सामाजिक सलोख्याचे वातावरण दुषित करणारा असल्याने, अशा फसव्या संदेशाला कुणीही बळी पडू नये असे आवाहन महावितरणद्वारे करण्यात आले आहे.

महाराष्ट्र वीज नियामक आयोगाच्या प्रकरण क्रमांक 226/2022 च्या आदेशानुसार मंदीर गुरुव्दारा, चर्च यासारख्या प्रार्थना स्थळांना व त्यांची सभागृहे, उद्याने यांची इतर कोणत्याही श्रेणीमध्ये नोंदणी नसल्यास त्यांना घरगुती ग्राहकांप्रमाणे वीजदर आकारणी करावी असे निर्देशित केले असून त्यानुसारच सर्व प्रर्थना स्थळांना वीजदर आकारणी केली जात असल्याचे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

समाज माध्यमांवर अशा फसव्या संदेशांच्या माध्यमातून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करणाऱ्यापासून सावध राहाण्याचे आवाहन महावितरणकडून (Mahavitaran) करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.