Pune news: पुणे मनपा तर्फे ‘टॉयकेथॉन’ अंतर्गत टाकाऊ वस्तूंपासून खेळणी बनवण्याची पहिली कार्यशाळा संपन्न

एमपीसी न्यूज : स्वच्छ अमृत महोत्सवानिमित्त पुणे महानगरपालिकेतर्फे (Pune Municipal Corporation) ‘टॉयकेथॉन’ (Toykethon) अंतर्गत टाकाऊ वस्तूंपासून खेळणी बनवण्याची पहिली कार्यशाळा शनिवार, नोव्हेंबर 5 रोजी आयोजित करण्यात आली होती. यामध्ये पाथवे फाउंडेशनच्या अर्वा कापसी (Arva Kapsi of Pathway Foundation) यांनी ३० मुलांना खेळणी बनवायला शिकवले.

chatushrungi news: लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने चतु:शृंगी पोलीस ठाण्याच्या दोन कर्मचाऱ्यांना लाच घेताना ताब्यात घेतले

यावेळी पुणेरी नायक संघाचे कॅप्टन सत्या नटराजन (Capt. Satya Natrajan) उपस्थित होते. त्यांनी यावेळी मुलांना मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी मुलांना टाकाऊ वस्तूंचा वापर कमी करणे (reduce use of waste) पुनर्वापर व पुनश्चक्रण (recycle and reuse) याविषयीचे महत्त्व समजावून सांगितले.

या कार्यशाळेमध्ये मुलांना टाकाऊतून टिकाऊ हा महत्त्वपूर्ण संदेश मिळाला. अश्या प्रकारच्या उपक्रमांमुळे टाकाऊ वस्तू कमी होऊन एका सुरक्षित भविष्याची हमी मिळण्यास मदत होईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.