junnar news: सरकारच्या कामगार विरोधी धोरणाच्या विरोधात भारतीय मजदूर संघ घालणार मंत्रालयाला घेराव

एमपीसी न्यूज : कामगार कायद्यातील एकतर्फी बदल, कामगारांच्या कायमस्वरूपी रोजगारावर आलेली गदा, सरकारचा कामगारांच्या करिता असलेला उदासीन दृष्टीकोन महाराष्ट्रातील असंघीटत कामगारांना कोणत्याही प्रकारची सामाजिक सुरक्षा नसणे, विविध ऊद्योगातील वाढत चाललेली कंत्राटी कामगारांची मोठी संस्खा, घटत चाललेला कायम स्वरूपी नोकरी अशाच विविध प्रश्नांवर संघटित व असंघीटत कामगारांच्या मागण्यां करिता भारतीय मजदूर संघ महाराष्ट्र प्रदेशाने दि 21 डिसेंबर रोजी मंत्रालय मुंबई येथे लाखोंच्या संख्येने येथे भव्य मोर्चा काठुन मंत्रालयाला घेराव घालण्यात येणार असल्याची घोषणा भारतीय मजदूर संघ महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अनिल ढुमणे यांनी आज 6 नोव्हेंबर रोजी सांस्कृतिक भवन जुन्नर येथे झालेल्या मजदूर चेतना यात्रेच्या उद्घाटन प्रसंगी केली आहे.

शिवनेरी गडा वर श्री शिवाई देवीच्या मंदिर पासून चेतना ज्योती सुरवात करण्यात आली. सदरील कार्यक्रमात मोठ्या संख्येने विविध उद्योगातील कामगार उपस्थित होते. भामसंघाने 21 डिसेंबर 2022 मंत्रालय मुंबई येथे कामगारांच्या विविध मागण्यांसाठी न्याय हक्कांच्या करिता कामगारांच्या भव्य मोर्चा काढणार असुन या मोर्चा मध्ये महाराष्ट्रातील संघटीत व असंघीटत क्षेत्रातील कामगारांच्या प्रलंबित विविध विषयांबाबतीत, कामगारांच्या विविध मागण्या सरकारकडे मांडणार आहे.

भारतीय मजदूर संघाच्या महत्वपूर्ण मागण्या-

  • असंघीटत कामगारांकरिता सामाजिक सुरक्षा कोड त्वरित लागु करून सुरक्षा मंडळा मार्फत लाभ देण्यात यावा.
  • कंत्राटी कामगार पध्दत बंद करून तेथे कार्यरत रिक्त जागांवर कार्यरत असलेल्या कंत्राटी कामगारांची कायम स्वरूपी नियुक्ती करावी, तसेच राजस्थान, आडिसा, हरियाणा, पंजाब राज्याप्रमाणे कंत्राटी कामगारांना कायम नोकरीत समाविष्ट करावे.
  • घरेलु कामगार कल्याण मंडळाचे काम व बांधकाम कल्याण मंडळामार्फत सुविधा, लाभ देण्यात यावेत.
  • अंगणवाडी सेविका व आशा वर्कर्स यांच्या मानधनात वाढ करून त्यांना शासकीय सेवेत सामावून घ्यावे.
  • बिडी ऊद्योगातील कामगारांना किमान वेतना ची प्रभावीपणे अंमलबजावणी त्वरित करण्यात यावी.
  • ई पी फ पेंशन दरमहा रू 5000 करण्यात यावी व महागाई भत्ता देण्यात यावा.
  • राज्य सरकारी कर्मचारी करिता जुनी पेंशन योजना लागु करण्यात यावी.
  • पेट्रोल, डिझेल व गॅस यांना जी ऐस टी च्या कक्षेत आणुन महागाई वर नियंत्रण आणावे.
  • संरक्षण उद्योगांचे निगमीकरण मागे घेण्यात यावे.
  • बॅंक व एल आय सी चे खाजगी करण मागे घेण्यात यावे.
  • महाराष्ट्रातील प्रलंबित ऊद्योगातील प्रलंबित किमान वेतन वाढ त्वरित घोषित करण्यात यावी.

या वेळी व्यासपीठावर भारतीय मजदूर संघाचे केंद्रीय पदाधिकारी चंद्रकांत धुमाळ, महाराष्ट्र प्रदेश महामंत्री मा मोहन येणूरे, प्रदेश संघटन मंत्री श्रीपाद कुटासकर, पुणे जिल्हा अध्यक्ष श्री अर्जुन चव्हाण, हे उपस्थित होते. सदर कार्यक्रमास महाराष्ट्रील विविध ऊद्योगातील पदाधिकारी प्रमुख उपस्थित होते, महाराष्ट्र विज कंत्राटी कामगार संघांचे अध्यक्ष निलेश खरात, अखिल भारतीय ठेका मजदूर महासंघाचे सरचिटणीस सचिन मेंगाळे, प्रदेश उपमहामंत्री राहूल बोडके, कोषाध्यक्ष सागर पवार, संघटन मंत्री उमेश आणेराव, वीज कामगार महासंघाचे तुकाराम डिंबळे, बिडी कामगारांचे ऊमेश विस्वाद, अभय वर्तक, राज्य सरकारी कामगारांचे पदाधिकारी प्रवीण निगडे, अॅड संध्या खरे, टेलिफोन ऊद्योगातील वंदना कामठे , बांधकाम कामगार संघटनेचे प्रदेश पदाधिकारी हरी चव्हाण, संजय सुरवसे , बापू दडस , घरेलु कामगार संघटनेचे रामदास शेवाळे उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार भामसंघाने पुणे जिल्हा सचिव बाळासाहेब भुजबळ यांनी केले आहे. या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्र विज कंत्राटी कामगार संघांचे मंचर विभाग अध्यक्ष राहूल हंडे, विभाग संघटन मंत्री दिपक शिंदे, पुणे झोन सचिव निखिल टेकवडे, श्री लेणाद्री देवस्थान चे संकेत वाणी, विशाल ताम्हाणे व मोठ्या प्रमाणात कंत्राटी कामगारांनी महत्वाचे योगदान दिले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.