chatushrungi news: लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने चतु:शृंगी पोलीस ठाण्याच्या दोन कर्मचाऱ्यांना लाच घेताना ताब्यात घेतले

लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने चतु:शृंगी पोलीस ठाण्याच्या दोन कर्मचाऱ्यांना लाच घेताना रांगेहात ताब्यात आज रविवारी संध्याकाळी घेतले आहे. अशी माहिती श्रीहरी पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त/ पोलीस उपअधीक्षक (प्रशासन) लाचलुचपत प्रतिबंधक विभाग(ला. प्र. वि ) पुणे यांनी दिली आहे.

चतु:शृंगी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस हवालदार प्रशांत जाधव व पोलीस शिपाई अजित गायकवाड यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

junnar news: सरकारच्या कामगार विरोधी धोरणाच्या विरोधात भारतीय मजदूर संघ घालणार मंत्रालयाला घेराव

अधिक माहिती देताना, पाटील म्हणाले की, “तक्रारदार यांच्याकडून तक्रारदार यांच्या आतेभावावर चोरीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी ५०,०००/- रुपये लाचेची मागणी पोलिसांनी केली होती. तडजोडी अंती ती रक्कम 25,000 रुपये करण्यात आली. पोलीस हवालदार प्रशांत जाधव व पोलीस शिपाई अजित गायकवाड यांना 25,000 रुपये स्वीकारल्यावर त्यांना रंगेहाथ ताब्यात घेतले आहे.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.