alandi news : ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ महाराज चरणी पंडीतराव रानवडे यांसकडून चांदीचे ताट,तांब्या ,फुलपात्र,वाट्या

एमपीसी न्यूज :- आळंदी शहराचे ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ महाराज व ग्रामदैवतांचे नैवेद्यासाठी शहरातील प्रगतशील शेतकरी पंडीतराव रानवडे (अध्यक्ष गावकरी भजनी मंडळ) यांच्या वतीने सोमवार दुपारी चांदीचे ताट, तांब्या,फुलपात्र आणि दोन वाट्या श्रींच्या चरणी अर्पण करणार आहे, याबाबत माहिती श्री भैरवनाथ महाराज उत्सव मंडळ समस्त ग्रामस्थ आळंदीकर यांनी दिली.

chatushrungi news: लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने चतु:शृंगी पोलीस ठाण्याच्या दोन कर्मचाऱ्यांना लाच घेताना ताब्यात घेतले

श्री भैरवनाथ मंदिरात काकडा आरती भजन सोहळा या कार्यक्रमाचा प्रारंभ अश्विन कृ.1 सोमवार 10 ऑक्टोबर रोजी सुरू झाला. या कार्यक्रमाची सांगता कार्तिक पौर्णिमा मंगळवार नोव्हेंबर 8 रोजी होणार आहे. त्याच दिवशी पहाटे 5 ते सकाळी 8 वा.पर्यंत काकडा भजन व महापूजा, सकाळी 9 ते 11 कार्तिक स्नान काकडा, भजन सोहळ्याच्या सांगता सोहळ्यानिमित्त काल्याचे व नंतर कीर्तन-महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रमाची संकल्पना गावकरी भजनी मंडळाची आहे. या कार्यक्रम सोहळ्याचे यंदाचे दुसरे वर्ष आहे. यानिमित्त पहाटे अनेक भाविक या मंदिरात येत असतात.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.