Pune : महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाचा पुणे विभाग मेळावा संपन्न

एमपीसी न्यूज – भारतीय मजदूर संघाशी संलग्न महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार (Pune) संघाच्या 14 व्या वर्धापन दिनानिमित्त वीज कंत्राटी कामगारांचा मेळावा बुधवारी (दि. 8) रोजी सौदामिनी सभागृह मंगळवार पेठ पुणे येथे संपन्न झाला. या मेळाव्यात पुणे शहर व सर्व तालुक्यातील 400 कामगार उपस्थित होते.

या मेळाव्यास मार्गदर्शन करण्यासाठी महावितरण कंपनी पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता राजेंद्र पवार उपमुख्य औद्योगिक सबंध अधिकारी शिरीष काटकर तसेच सहाय्यक कामगार आयुक्त डी. डी. पवार संघटनेचे प्रदेश अध्यक्ष निलेश खरात, महामंत्री सचिन मेंगाळे, उपमहामंत्री राहुल बोडके, संघटनमंत्री उमेश आनेराव, कोशाध्यक्ष सागर पवार, भारतीय मजदूर संघ पुणे जिल्हा अध्यक्ष अर्जुन चव्हाण, उमेश विस्वाद, महिला प्रमुख वंदना कामठे, आणि पुणे झोन अध्यक्ष सुमित कांबळे, सचिव निखिल टेकवडे पुर्व अध्यक्ष शरद संत, कामगार महासंघाचे तुकाराम डिंबळे उपस्थित होते.

राज्याचे ऊर्जामंत्री यांनी संपाच्या पार्श्वभूमीवर 4 जानेवारी 2023 रोजी कंत्राटी कामगारांना (Pune) सामावून घेण्याचा सूचक इशारा दिला आहे. कामगारांनी प्रामाणिकपणे जनतेला वीज सेवा पुरवून वीज बिलाचा महसूल गोळा करावा व उत्तम सेवा देऊन महावितरणचे नाव लौकीक वाढवावे, तसेच सुरक्षा कार्यप्रणाली नुसार काम करावे असे प्रतिपादन मुख्य अभियंता राजेंद्र पवार यांनी केले आहे.

Moshi : राष्ट्रीय महासत्संग सोहळ्यानिमित्त शनिवारी वाहतुकीत बदल

कामगार विभाग हा सर्व समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध असून पुणे जिल्हा कामगार आयुक्त कार्यालयातून या कामगारांना अनेकदा न्याय दिल्याचे दाखले सहाय्यक कामगार आयुक्त डी. डी. पवार यांनी दिले. तसेच, कंत्राटदार कंपनी व प्रशासन यांनीही कंत्राटी कामगारांना 10 तारखेपूर्वी संपूर्ण वेतन, महागाई भत्ता, व कामगार कायद्यातील तरतूदीचे पालन या बाबतीत अंमलबजावणी करावी. असे प्रतिपादन केले आहे.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचालन सरचिटणीस सचिन मेंगाळे व आभार प्रदर्शन सुमीत यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.