Moshi : राष्ट्रीय महासत्संग सोहळ्यानिमित्त शनिवारी वाहतुकीत बदल

एमपीसी न्यूज – श्री स्वामी समर्थ सेवा सत्संग समिती पुणे  (Moshi) यांच्या वतीने राष्ट्रीय महासत्संग सोहळा मोशी येथील आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्र येथे होणार आहे. हा सोहळा शनिवारी (दि. 11) रोजी होणार आहे. या सोहळ्यासाठी राज्यभरातून लाखो भाविक येणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर शनिवारी सकाळी सात ते रात्री साडेअकरा वाजताच्या कालावधीत मोशी परिसरातील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस उपआयुक्त विवेक पाटील यांनी आदेश दिले आहेत.

(मोशी ते जाधववाडीकडे जाणारा मार्ग) संभाजी महाराज चौक ते बोराडे वस्ती अशा जाणाऱ्या वाहनांना प्रवेश बंद आहे. ही वाहने संभाजी महाराज चौकातून स्पाईन रोड मार्गे इच्छित स्थळी जातील.

स्पाईन रोड सरदार चौकाकडून आंतरराष्ट्रीय प्रदर्शन व संमेलन केंद्र मोशी येथे येण्यास वाहनांना बंदी आहे. ही वाहने पांजरपोळ चौकातून इच्छित स्थळी जातील.

Chinchwad Bye Election : उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी उरले अवघे चार तास; राहुल कलाटे माघार घेणार का?

स्पाईन रोड, स्पाईन सिटी मॉल चौकाकडून आंतरराष्ट्रीय प्रदर्शन व संमेलन केंद्र मोशी येथे येण्यास वाहनांना बंदी करण्यात आली आहे. ही वाहने पांजरपोळ चौकातून इच्छित स्थळी (Moshi) जातील.

स्पाईन रोड संत नगर चौकाकडून आंतरराष्ट्रीय प्रदर्शन व संमेलन केंद्र मोशी येथे येण्यास वाहनांना बंदी करण्यात आली आहे. ही वाहने पांजरपोळ चौकातून इच्छित स्थळी जातील.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.