Chinchwad Bye Election : उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी उरले अवघे चार तास; राहुल कलाटे माघार घेणार का?

एमपीसी न्यूज – चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी (Chinchwad Bye Election) दाखल केलेले उमेदवारी अर्ज माघार घेण्याची आज (शुक्रवार) अंतिम मुदत आहे. दुपारी 3 वाजेपर्यंतच अर्ज मागे घेता येणार आहेत. त्यामुळे अर्ज मागे घेण्यासाठी अवघे 4 तास उरले आहेत. महाविकास आघाडीतून उमेदवारी नाकारल्यानंतर अपक्ष अर्ज दाखल केलेले शिवसेनेचे माजी नगरसेवक राहुल कलाटे माघार घेतात का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने माघार घ्यावी मी पण माघार घेतो असे कलाटे यांनी म्हटले आहे. दरम्यान, शिवसेनेचे उपनेते सचिन अहिर हे कलाटे यांच्या मनधरणीसाठी वाकड येथे दाखल झाले आहेत. उद्धव ठाकरे यांच्या सोबत संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ठाकरे यांच्या संपर्कानंतर कलाटे माघार घेणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.    

चिंचवड पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून अश्‍विनी जगताप, राष्ट्रवादीकडून नाना काटे, अपक्ष म्हणून राहूल कलाटे यांच्यासह 33 उमेदवार रिंगणात आहेत. या 33 उमेदवारांमध्ये दोन राष्ट्रीयकृत पक्षाचे, 5 नोंदणीकृत पक्षाचे तर 26 अपक्षांचा समावेश आहे. बुधवारी अर्ज छाननीची प्रक्रिया पार पडल्यानंतर आज गुरूवार आणि आज शुक्रवार अर्ज माघार घेण्याची मुदत आहे. गुरूवारी एकानेही उमेदवारी अर्ज मागे घेतला नाही.

आज दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत. त्यासाठी अवघे 4 तास शिल्लक आहेत. या वेळेत कोण अर्ज मागे घेते का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दुपारी 3 नंतर निवडणूक तिरंगी की दुरंगी होणार हे स्पष्ट होईल. 33 उमेदवारांनी अर्ज कायम ठेवल्यास 2 मतदान यंत्रे लागतील. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी दुपारी 3 वाजेपर्यंत (Chinchwad Bye Election) वेळ आहे. त्यानंतर अपक्ष उमेदवारांना चिन्ह वाटप केले जाणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांनी सांगितले.

PIFF 2023 : 21 व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘मदार’ या मराठी चित्रपटाने उमटविली मोहोर

दरम्यान, चिंचवड मतदार संघात 510 मतदान केंद्र आहेत. एका बॅलेट युनिटवर 15 उमेदवार आणि एक नोटा असे 16 पर्याय उपलब्ध असतात. 33 उमेदवार असल्याने 1 बॅलेट युनिटवर 15 उमेदवार असे 3 बॅलेट युनिट लागणार आहेत. 510 मतदान केंद्रासाठी तब्बल 1 हजार 530 बॅलेट युनिट लागणार आहेत. बॅलेट युनिटची संख्या वाढली की मतदान आणि मतमोजणीसाठी उशिर होण्याची शक्‍यता आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.