PCMC : राष्ट्रवादी-भाजपच्या श्रेयवादात भोसरीतील उद्घाटने रखडली

एमपीसी न्यूज – महापालिकेच्या विविध विकास कामांचे (PCMC)उद्घाटन, भूमिपूजनाचे श्रेय घेण्यासाठी राज्यातील सत्तेत एकत्र असलेल्या भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील शह-काटशहाच्या राजकारणामुळे भोसरीतील उद्घाटने रखडली आहेत.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शुक्रवारी पिंपरी, चिंचवडमधील उद्घाटने झाल्यानंतर रविवारी भोसरीतील उद्घाटने दुसरे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्याचे नियोजित होते. भाजपने उद्घाटनाचे फलक देखील भोसरी मतदारसंघात लावले होते.

परंतु, ऐनवेळी फडणवीस यांचा पिंपरी- चिंचवडचा दौरा (PCMC)रद्द झाला. आळंदीतूनच ते मुंबईला गेले. त्यामुळे भोसरीतील उद्घाटने रखडली.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने शहरवासीयांना दर्जेदार सुविधा देण्यासाठी विविध प्रकल्प, सुविधा उभारल्या आहेत. 15 उद्घाटने आणि भूमिपूजनासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना आणावे, यासाठी तिन्ही पक्षातील स्थानिक नेतेमंडळीचा महापालिका प्रशासनावर दबाव हाेता. त्यामुळे कामे हाेऊन फक्त उद्घाटनाविना विविध प्रकल्पांचे लाेकार्पण रखडले हाेते.

अखेर मुख्यमंत्री आणि दाेन्ही उपमुख्यमंत्र्यांची एकत्र वेळ मिळत नसल्याचे लक्षात आल्यानंतर पालिकेने शुक्रवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आठ प्रकल्पाचे लाेकार्पण आणि उद्घाटने उरकून घेतली. त्यात यांत्रिकी पध्दतीने रस्ते साफसफाई करण्याच्या कामाचा शुभारंभ, दिव्यांग व मतिमंद यांच्यासाठी कल्याणकारी केंद्र, वायसीएम रूग्णालयातील पदव्युतर पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी निवासस्थान इमारत, काळेवाडी येथील घन कचरा ट्रान्सफर स्टेशन, सांगवीमधील नुतनीकरण केलेल्या जलतरण तलाव नागरिकांसाठी खुला करणे, वाकडमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे बॅडमिंटन काेर्ट बांधणे या कामांचे भूमिपूजन, कासारवाडी व गवळीमाथा येथे घरगुती घातक कचरा प्रक्रिया प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले.

Chinchwad : महाराष्ट्राच्या विकासात तेलगू मन्नेरवारलू समाजाचे मोठे योगदान – शिरीष पोरेड्डी 

भोसरीतील प्रकल्पाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाली नाहीत. भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी भोसरीतील प्रकल्पाचे उद्घाटन, भूमिपूजन दुसरे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यासाठी आग्रही आहेत.

प्रशासनाने रविवारी भाेसरीतील लाईट हाऊस, 17.9 टीपीडी क्षमतेचा जैव वैद्यकीय घनकचरा विल्हेवाट प्रकल्प, बाेपखेल डब्ल्यूऔडल्ल्यू सेंटर, सर्व्हे नं.217 येथे सांडपाणी प्रकल्प, कुदळवाडी-जाधववाडीत सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचे उद्घाटन, च-हाेलीत निवासी गाळे, चिखलीत टाऊन हाॅल, हाॅटेल वेस्ट टू बायाेगॅस प्रकल्प ही उद्घाटने तर माेशीत गायरान जागेवर रूग्णालय उभारणे, माेशी कचरा डेपाेतील कच-याचे बायाेमायनिंग टप्पा दाेनचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्याचे नियोजन केले होते.

भाजपने उद्घाटनाचे फलक देखील चिखली परिसरात लावले होते. परंतु, फडणवीस यांनी पिंपरी- चिंचवडचा दौरा रद्द केला. आळंदीतूनच ते मुंबईला गेले. त्यामुळे भोसरीतील उद्घाटने रखडली आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.