Deadbody Found: कात्रज तलावात आढळला पुरुषाचा मृतदेह, परिसरात खळबळ

एमपीसी न्यूज : पुण्यातील कात्रज तलावात एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह (Deadbody of unknown person Found) आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. रविवारी दुपारच्या सुमारास मृतदेह तरंगत असल्याचे दिसून आल्यानंतर या परिसरात घबराट उडाली होती.

talegaon dabhade news: इंदोरी येथील एका तरुणाचा खून

कात्रज येथे नानासाहेब पेशवे तलाव आहे. रविवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास या तलावात सुरक्षारक्षक शेखर दिघे यांना एक मृतदेह पाण्यावर तरंगत असल्याचे दिसून आले. त्यानंतर त्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह पाण्याबाहेर काढण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांची देखील मदत घेण्यात आली. मयत व्यक्तीची ओळख अद्याप पटली नाही. या व्यक्तीचे वय अंदाजे 45 इतके आहे.

भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.