The Kashmir Files : द कश्मीर फाईल्स` पाहून काश्मिरी बांधव भावनाविवश (Video)

एमपीसी न्यूज –  पिंपरी चिंचवडमध्ये राहात असलेल्या काश्मिरी पंडित तरुणांनी  आयोजित केलेल्या `द कश्मीर फाईल्स` या चित्रपटाच्या `विशेष शो`ला  शहरातील काश्मिरी पंडित कुटुंबीयांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

आकुर्डीतील आयनॉक्स मल्टिप्लेक्समध्ये झालेला हा शो पाहण्यासाठी सुमारे दीडशे ते दोनशे बंधू भगिनी  उपस्थित होते.

चित्रपट पाहताना काश्मिरी बांधवांकडून भारत माता की जय, जय महाराष्ट्रची जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.  ज्या काश्मिरी बांधवांनी 1990 मधील नरसंहार अनुभवला आहे, अशा ज्येष्ठ बांधवांनी चित्रपटाच्या प्रारंभी आणि मध्यंतरास त्यांच्या भावना व्यक्त केल्या. ही सत्य घटना 32 वर्षांनंतर देशबांधवांसमोर आल्याचे सांगितले.

काश्मीरमध्ये कोणीही पर्यटनासाठी गेल्यास त्यांनी आमच्या जाळलेल्या घरांना जरूर भेट द्यावी, असे आवाहनही  त्यांनी केले. आपल्यावर गुदरलेल्या प्रसंगांच्या आठवणीने भावनाविवश झालेल्या उपस्थित काश्मिरी बंधू भगिनींनी चित्रपट पाहताना आणि नंतरही अश्रूंना वाट करून दिली.

परेश रावल, विकास च्रुंगू, अजय कर्नाइल, चेतन पटवारी, सुनील मल्ला आदी काश्मिरी बांधवांनी या शो चे आयोजन केले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.