Nigdi : चॉकलेटचे आमिष दाखवून तो करायचा अश्लील चाळे

एमपीसी न्यूज – चॉकलेटचे आमिष दाखवून सहा वर्षाच्या मुलीवर एक नराधमाने तीन महिने लैंगिक अत्याचार केला. तीन महिन्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. हा धक्कादायक प्रकार निगडी परिसरात घडला.

याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार  मोहसीन मोहमद शेख याच्या विरोधात बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 2012 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा पीडित मुलीच्या ओळखीचा होता. तो पीडित मुलीला चॉकलेटचे आमिष दाखवून घरी घेऊन जात असे. घरी नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार करत असे. हा अत्याचार असह्य झाल्यानंतर मुलीनेच हा प्रकार तिच्या आईला सांगितला. त्यानंतर आईने निगडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.