Pune : वेद आणि पुराणात स्त्रियांचे स्थान मोठे – ह.भ.प. दर्शन वझे

एमपीसी न्यूज – पूर्वीच्या काळात स्त्रियांना चांगली वागणूक मिळाली नाही. असे आजकाल म्हटले जाते, परंतु आजच्या पेक्षा पूर्वी स्त्रियांना चांगली वागणूक मिळाली आहे. वेद आणि पुराणाची परंपरा खूप सुंदर आहे, असे  ह.भ.प. कीर्तनकार दर्शन वझे यांनी कीर्तनाचे निरूपण करताना सांगितले.

वेद आणि पुराणाची परंपरा खूप मोठी आणि सुदंर आहे. गुरु वशिष्ठांनी देखील आपले आत्मज्ञान पत्नीला दिले आणि तिला समान पातळीवर आणून ठेवले. त्यामुळे वेद आणि पुराणात स्त्रियांचे स्थान मोठे आहे. तसेच अनुभवाचे बोल न ऐकल्यामुळे सध्या भारत मागे पडत आहे. आपला भाव देव आणि देशावर राहिला नाही.

_MPC_DIR_MPU_II

शिवजयंतीच्या दिवशी तरुण छत्रपती शिवाजी महाराजांना डोक्यावर घेऊन नाचतात. परंतु छत्रपती शिवाजी महाराज हे डोक्यावर घेऊन नाचण्याचे नव्हे तर डोक्यात घालण्याचे व्यक्तिमत्व आहे. आपला धर्म लांब जातोय, तो वाचवायला हवा, असे कीर्तनकार दर्शन वझे म्हाणाले.

रामजी संस्थान तुळशीबागेच्या वतीने तुळशीबाग राममंदिराच्या सभा मंडपात भक्तीसंगीताच्या कार्यक्रमाचे आयोजन (दि.21) करण्यात आले होते. यावेळी संस्थानचे कार्यकारी विश्वस्त भरत तुळशी बागवाले, विश्वस्त रामदास तुळशीबागवाले, राघवेंद्र तुळशीबागवाले, रामचंद्र तुळशीबागवाले, रघुराज तुळशीबागवाले, श्रीपाद तुळशीबागवाले आदी मान्यवर उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.