Dighi : आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते दिघी येथील शाळा इमारतीचे भूमिपूजन 

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने प्रभाग क्र.४ दिघी मधील आरक्षण क्र २/१२२ येथील शाळा इमारत बांधकामाचे भूमिपूजन आज (दि.23) भोसरी विधान सभेचे आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते संपन्न झाले. नागरिकांचे हित असलेल्या कामांना प्राधान्य देऊन त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केले आहे, असे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले. 

आमदार महेश लांडगे म्हणाले, विकसित करण्यात येणा-या आरक्षणांच्या जागा त्या भागातील भूमिपुत्रांच्या जागेत असतात. त्यामुळे त्या जागी उभारण्यात येणा-या इमारतीस त्या भूमिपूत्रांचे नाव लावण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात यावे. त्या प्रमाणे येथील बांधकाम करण्यात येणा-या शाळेच्या इमारतीचे बापूसाहेब तुकाराम परांडे या नावाने नामकरण करण्याची सूचनाही त्यांनी केली. जे काही काम केले ते नागरिकांसाठी केले, त्यामध्ये रस्ते, पाणी, ड्रेनेज, शिक्षण, आरोग्य व वैद्यकीय सेवा विषयक कामांना प्राधान्य देण्यात आले, असेही ते यावेळी म्हणाले.

महापौर उषा ऊर्फ माई ढोरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास नगरसदस्य विकास डोळस, लक्ष्मण उंडे, नगरसदस्या भीमा फुगे, नानी ऊर्फ हिराबाई घुले, निर्मला गायकवाड, माजी नगरसदस्य दत्तात्रय गायकवाड,सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, कार्यकारी अभियंता संजय घुबे, प्रविण घोडे, माहिती व जनसंपर्कचे प्रफुल्ल पुराणिक, दिघीकर विकास प्रतिष्ठाणचे उत्तम घुगे, रविभाऊ चव्हाण, संतोष जाधव, कृष्णाशेठ वाळके, कुलदिप परांडे, संदीप परांडे, सुजित तरकसे, दत्ताघुले आदि उपस्थित होते.

दिघी येथील उभारण्यात येणा-या शाळेच्या बांधकामाचे क्षेत्रफळ ३८८७ चौ.मी. असून या कामी रु. १२ कोटी ४३ लाख इतका खर्च येणार आहे. सदरचे बांधकाम ३६ महिन्यात पूर्ण करण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.