Pune-Mumbai E-Way : अपघातानंतर साडेसात तास बंद असलेला पुणे-मुंबई एक्सप्रेस वे अखेर वाहतुकीस खुला

एमपीसी न्यूज – खंडाळा घाटात अमृतांजन पुलाखाली रसायनाची वाहतूक करणारा टँकर पलटी झाल्यामुळे सुमारे साडेसात तास बंद असलेली पुणे-मुंबई महामार्गावरील मुंबई मार्गिका अखेर खुली झाली आहे. 

पुणे – मुंबई एक्सप्रेस वेवर खंडाळा घाटातील अमृतांजन पुलाखाली केमिकल घेऊन जाणारा टँकर पलटी झाला. त्यामुळे मुंबईला जाणार मार्ग बंद झाला. तब्बल साडे सात तासानंतर मार्गिका मोकळी झाल्याने, महामार्गावरील वाहतूक सुरू झाली आहे. पहाटे साडे पाच वाजता हा अपघात झाला, त्यानंतर रस्त्यावर पसरलेले केमिकल बाजूला करून दुपारी एकच्या सुमारास मार्ग वाहतुकीसाठी मोकळा केला. दरम्यान, सध्या महामार्गावर वाहतूक पूर्ववत झाली असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पहाटे अपघात झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर केमिकल रस्त्यावर पसरले, त्यांवरून वाहने सरकू लागल्याने सुरक्षेच्या कारणास्तव मार्गिका बंद करण्यात आली. त्यानंतर केमिकल बाजूला करून दुपारी एकच्या सुमारास मार्ग खुला करण्यात आला. सकाळपासून मुंबईच्या दिशेने जाणा-या वाहनांची मोठी रांग महामार्गावर लागली होती. दरम्यान, मार्ग खुला झाल्यानंतर संथ गतीने वाहने पुढे सरकू लागली व वाहतूक कोंडी कमी होऊ लागली.

सध्या पुणे – मुंबई एक्सप्रेस वेवरील वाहतूक सुरळीत सुरू असून, अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही, अशी माहीती महामार्ग पोलिसांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.