Chikhali News: प्लॉगेथॉन मोहिमेत चार टन कच-याचे संकलन

एमपीसी न्यूज –  पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ‘क’ क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने सेक्टर 13 येथील मोकळ्या मैदान परिसरात आयोजित प्लॉगेथॉन मोहिमेत सुमारे 4 टन सुका कचरा गोळा करण्यात आला.

जाधववाडी  चिखली येथे आज (शनिवारी) राबविण्यात आलेल्या स्वच्छता अभियानात सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, सहाय्यक आरोग्य अधिकारी बी. बी. कांबळे, मुख्य आरोग्य निरीक्षक शांताराम माने, आरोग्य निरीक्षक लक्ष्मण साळवे, वैभव कांचनगौडा यांच्यासह सुमारे 70 कर्मचारी सहभागी झाले होते.

आरोग्य सहाय्यक सागर सणस, आरोग्य मुकादम अभिमान बगाडे, संतोष जठार व सचिन घवाने, महापालिका व ठेकेदार कर्मचारी यांच्यासह सेक्टर १३ मधील आर. टी. ओ. मैदानामध्ये प्लॉगेथॉन मोहिम आयोजित करण्यात आली. यामध्ये सुमारे 4 टन सुका  कचरा (प्लास्टिक, कागद) उचलून घेण्यात आला. नागरिकांनी आपल्या परिसरात स्वच्छता राखावी. कचरा महापालिकेच्या वाहनात विलगीकरण करून द्यावा. रस्त्यावर अथवा खुल्या जागेवर कचरा टाकून परिसरात अस्वच्छता निर्माण करु नये, असे आवाहन महापालिकेने केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.