Hinjavadi News: अज्ञात चोरट्याने मारहाण करून तरुणीकडील सोन्याचे दागिने व मोबाईल पळवले

एमपीसी न्यूज : तरुणीची गाडी थांबवुन अज्ञात चोरट्याने मारहाण करून तिच्याकडील कडील 88,000 रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने व मोबाईल घेऊन पळाल्याची घटना नेरे गावात घडली आहे.

ही घटना 6 डिसेंबर रोजी दुपारी 2:30 वाजेच्या सुमारास संत तुकाराम साखर कारखान्याच्या पाठीमागे 200 फूट अंतरावर कच्च्या रोडवर नेरे या ठिकाणी घडली आहे.

याबाबत पीडित तरुणी, वय 24 वर्षे यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Navale Bridge Accident : खासदार सुप्रिया सुळे यांनी नवले ब्रिजवर होणाऱ्या अपघाताचा मुद्दा लोकसभेत मांडला

याप्रकरणी अनोळखी इसमाच्या विरोधात भा.द.वि कलम 394 आणि गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अनोळखी आरोपीने फिर्यादी यांची गाडी थांबवून “मी चोर आहे, तुझे दागिने मला दे”,असे म्हणून फिर्यादी यांच्या गळ्यातील एक तोळा वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र किंमत 45,000 रुपये काढून घेतले.

त्यानंतर फिर्यादी यांनी मदतीसाठी आरडा ओरडा केला असता त्यांचे तोंड दाबून त्यांचे 15,000 रुपये किंमतीचे तीन ग्राम वजनाचे कानातील टॉप्स, 8,000 रुपये किंमतीचे बोटातील अंगठी असे एकूण 68 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने घेतले.

तसेच फिर्यादीच्या कडील 20,000 रुपये किंमतीचा मोबाईल जबरदस्तीने काढून घेत आरोपीने फिर्यादी यांना त्याच्या हातातील ऊसाच्या कांडक्याने हातावर मारहाण करून एकूण 88,000 रुपये किंमतीचे सोन्याची दागिने व मोबाईल घेऊन त्याच्या जवळील मोटरसायकल त्याच ठिकाणी सोडून पळून गेला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.