Pune news: विजेची तार अंगावर पडल्याने तरुणाचा जागीच मृत्यू

The young boy died on the spot due to electric wire falling on his body.

एमपीसी न्यूज- विजेची तार अंगावर पडल्याने झालेल्या दुर्घटनेत वीस वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला. खराबवाडी येथील वाघजाई नगरच्या हद्दीत हा प्रकार घडला. विशाल ( वय २०, उत्तर प्रदेश ) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. मंगळवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, मयत तरुण एका कॅन्टीनमध्ये कामाला होता. एका कंपनीत चहा देण्यासाठी दुचाकीवरून जात असताना विजवाहक  तार तुटून त्याच्या अंगावर पडली आणि त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

दरम्यान अशा प्रकारची दुर्घटना घडल्यामुळे नागरिकांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे एका तरुणाचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात येतोय.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.