Pimpri News: झोपडपट्टीतील नागरिकांना रेशनकार्ड द्या – अण्णा बनसोडे

एमपीसी न्यूज – पिंपरी मधील गांधीनगर, खराळवाडी झोपडपट्टी भागातील अनेक गरीब कुटुंबाकडे रेशनकार्ड नाहीत. अनेक कुटुंबाचे रेशन कार्ड बंद झाले. त्यामुळे नागरिकांना शासनाच्या मोफत रेशनचा लाभ घेता येत नाही. त्यासाठी झोपडपट्टीतील नागरिकांना रेशनकार्ड काढून द्यावे, अशी सूचना आमदार अण्णा बनसोडे यांनी अधिका-यांना केली.

गांधीनगर व खराळवाडी झोपडपट्टी भागातील अनेक गरीब कुटुंबांकडे रेशनकार्ड नाहीत. अनेक कुटुंबांचे रेशनकार्ड बंद झाले आहे. अनेक रेशनकार्ड दुकानांना जोडले नसल्यामुळे नागरिकांना शासनाच्या मोफत रेशनचा लाभ घेता येत नाही. तसेच शासनाच्या अनेक सुविधांपासून वंचित रहावे लागते.

या भागात हातावर पोट असणारे तसेच रोजंदारीवर काम करणाऱ्या लोकांची संख्या जास्त आहे. सध्या कोविड काळात अनेकांच्या नोकऱ्या व हातातले काम गेले आहे. नागरिक वाढत्या महागाईने त्रस्त आहेत. किमान रेशनवरील धान्य मिळेल. तसेच शासकीय योजनाचा लाभ मिळावा. यासाठी येथील नागरिकांनी फॉर्म भरून दिले आहेत. परंतु, त्यांना अजून रेशनकार्ड  भेटले नाही. समस्यांचे निवारण झाले नाही, अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग भांडेकर यांनी आमदार बनसोडे यांना दिली.

आमदार बनसोडे यांनी तात्काळ दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांना बोलून फॉर्म भरलेल्या सर्व नागरिकांना चिंचवड येथे रेशन कार्ड वाटप करण्याचे आदेश दिले. नागरिकांकडून रेशनकार्डचे फॉर्म भरून घेण्यात आले. सतीश भांडेकर, ऍड बी. के. कांबळे, बाबू म्हेत्रे, प्रवीण कांबळे, रमा लक्ष्मण गायकवाड, राजू बनपट्टे उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.