Pune : दोन कंटेनरच्या अपघातात कंटेनर चालकाचा मृत्यू

एमपीसी न्यूज : समोरच्या कंटेनरला पाठीमागून येणाऱ्या कंटेनरने (Pune) जोरदार धडक दिली. या अपघातात मागून धडक दिलेल्या कंटेनर चालकाचा जागीच मृत्यू झाला.  हा अपघात गुरुवारी (दि.4) रात्री उशिरा मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर ओझर्डे गावच्या हद्दीत घडला.

निलेश बाबासो सपकाळ (वय 35 रा .कोरेगाव,सातारा) असे मयत कंटेनर चालकाचे नाव असून त्याच्या विरोधात शिरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल शुभम राजगुरे यांनी फिर्याद दिली आहे.

Chinchwad : बेशिस्त वाहन चालकामुळे पादचारी नागरिकांचे जीव धोक्यात; उपाययोजनांची नागरिकांची मागणी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने त्याच्या ताब्यात असलेले कंटेनर (एम एच 46 बी एफ 7479) हयगयीने व निष्काळजीपणे चालवून समोर जाणाऱ्या कंटेनरला (Pune) पाठीमागून जोरात धडक दिली. या अपघातात आरोपीच्या कंटेनरचे पूर्ण नुकसान झाले असून आरोपीच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्याचा या अपघातात मृत्यू झाला आहे. या अपघाताची नोंद शिरगाव पोलीस ठाण्यात केली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.