Khed : पूर्ववैमनस्यातून विद्यार्थ्याला शस्त्राने मारहाण

एमपीसी न्यूज – पूर्ववैमनस्यातून दोघांनी एका 19 वर्षीय विद्यार्थ्याला (Khed) लाथा-बुक्क्यांनी व शस्त्राने मारहाण करत गंभीर जखमी केले. ही घटना डुडुळगाव येथील आळंदी मोशी रोड येथे शुक्रवारी (दि.5) दुपारी घडली.

याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात अमोल विलास शिंगाडे ( वय 19, रा . कुरुळी, खेड) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीवरून दिघी पोलिसांनी गणेश चव्हाण, चैतन्य व त्याच्या इतर दोन साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे.

Chinchwad : बेशिस्त वाहन चालकामुळे पादचारी नागरिकांचे जीव धोक्यात; उपाययोजनांची नागरिकांची मागणी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे डुडुळगाव येथील आळंदी मोशी रोड वरील पीएमपीएमएल कार्यशाळेच्या समोर त्यांच्या मित्रासोबत थांबले होते. यावेळी जुन्या (Khed) झालेल्या भांडणाचा राग मनात धरून आरोपींनी फिर्यादी व त्यांचा मित्र नागेश जाधव यांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

तसेच त्यांच्या जवळील धारदार शस्त्राने फिर्यादीवर वार करत त्यांना गंभीर जखमी केले. यावरून दिघी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.