Chinchwad : दिलीप माळी यांची श्रीराम मंदिर परिसरात लाईव्ह पेंटिंग या ऐतिहासिक उपक्रमासाठी निवड

एमपीसी न्यूज : अयोध्येत श्रीराम मंदिराचा उदघाटन सोहळा 22 जानेवारी (Chinchwad) रोजी संपन्न होणार आहे. भारतातील महान संत जगद्गुरु रामभद्राचार्यजी यांच्या नियंत्रणाखाली चालवलेली रामानंद मिशन विश्वस्त संस्थेने यानिमित्त ‘अमृत महोत्सव’ आयोजित केला आहे.  या अंतर्गत लाईव्ह पेंटिंग हा उपक्रम आयोध्यानगरीत श्रीराम मंदिर परिसरात आयोजित केला आहे. या ऐतिहासिक उपक्रमासाठी भारतातून 20 चित्रकारांची निवड करण्यात आली आहे. वाची आर्ट गॅलरी, मुंबई यांच्या चित्रकार निवड चाचणीतून  पिंपरी चिंचवड शहरात वास्तव्यास असणारे सुप्रसिद्ध चित्रकार आणि प्रेरणा शाळेतील कलाशिक्षक दिलीप माळी यांची निवड झाली आहे.

दिलीप माळी हे मूळचे कऱ्हाड तालुक्यातील ओंड या गावचे. बेळगाव येथे ए.टी. डी. आणि पुढे अभिनव महाविद्यालयातून जी. डी .आर्ट, ए. एम. पूर्ण केले आहे. आजपर्यंत वैश्विक आर्ट गॅलरी, जहांगीर आर्ट गॅलरी मुंबई, वाची आर्ट गॅलरी, बालगंधर्व कलादालन, नेहरू सेंटर, मुंबई, ललित कला अकॅडमी दिल्ली येथे त्यांच्या चित्रांची प्रदर्शने झाली आहेत.

Talegaon Dabhade : पत्रकार दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन; पत्रकारांचा सन्मान

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या गणेशोत्सव स्पर्धेचे 20 वर्षाहून अधिक काळ ते परीक्षक आहेत. या ऐतिहासिक उपक्रमासाठी भारतातून 20 चित्रकारांची निवड केली आहे. 10 कलाकारांच्या पहिला गटाला 14 जानेवारी ते 17 जानेवारी पर्यंत पेंटिंग पूर्ण करायचे (Chinchwad) आहे, तर दुसऱ्या गटाला 18 जानेवारी ते 21 जानेवारी या काळात पेंटिंग पूर्ण करायचे आहे. कलाकारांनी तिथे प्रत्यक्ष स्थळावर उपस्थित राहून चित्र बनवायचे आहेत. आणि त्यातून किमान दोन चित्रे मंदिर परिसरासाठी भेट द्यायची आहेत.

कलाकारांची कलात्मक क्षमता अत्यंत मौल्यवान आहे. दिलीप माळी यांचे प्रेरणा शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तुकाराम गुजर, मानद सचिव कांतीलाल गुजर आणि प्रेरणा परिवाराने अभिनंदन केले आहे. शिवाय त्यांच्या मित्रमंडळींकडून, मूळ गावातील अनेकांनी याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. पिंपरी चिंचवडकरांसाठी त्यांची निवड म्हणजे सर्वांसाठी अभिमानास्पद आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.