Talegaon Dabhade : पत्रकार दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन; पत्रकारांचा सन्मान

एमपीसी न्यूज – पत्रकार दिनानिमित्त शनिवारी (दि. 6) मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (Talegaon Dabhade) वतीने मराठी पत्रकारितेचे जनक, दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले.

यावेळी मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष दत्तात्रय पडवळ, मावळ तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष विशाल वहिले, पुणे जिल्हा सरचिटणीस सुनिल शिंदे, जेष्ठ नागरिक सेल मावळ तालुका अध्यक्ष पांडुरंग दाभाडे, भरत राजीवडे, मावळ तालुका विद्यार्थी कॅाग्रेस अक्षय मु्-हे, माग्रा.प.सदस्य बारकुभाऊ ढोरे, नरेंद्र मु-हे, शंकर मोढवे, बाळासाहेब तुमकर, पंकज भामरे, श्रेयस भिडे, प्रणव ढोरे, राहिल तांबोळी आदी उपस्थित होते.

Alandi : एमपीसी न्यूजच्या बातमीची तातडीने दखल; पद्मावती रस्त्याची सार्वजनिक बांधकाम विभागा मार्फत तात्काळ पाहणी

स्थानिक, जिल्हा, राज्य, देश तसेच जागतिक पातळीवरील समस्या आपल्या लेखणीच्या माध्यमातून समाजापर्यंत पोहोचवणाऱ्या व रचनात्मक उपक्रमांना यथायोग्य प्रसिद्धी देणाऱ्या, लोकशाहीचा वैचारिक कणा तसेच चौथा स्तंभ असलेल्या मावळ ग्रामीण पत्रकार संघातील पत्रकार बंधुंना सन्मानित करण्यात (Talegaon Dabhade) आले.

यावेळी जेष्ठ पत्रकार विजय सुराणा, ज्ञानेश्वर ठाकर, गणेश विनोदे, सचिन ठाकर, सचिन शिंदे, संकेत जगताप, संजय दंडेल, महादेव वाघमारे, योगेश घोडके, अभिषेक बोडके आदिंना सन्मानित करण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.