Alandi : एमपीसी न्यूजच्या बातमीची तातडीने दखल; पद्मावती रस्त्याची सार्वजनिक बांधकाम विभागा मार्फत तात्काळ पाहणी

एमपीसी न्यूज : आळंदी येथील पदमावती रस्त्यावर (पी डब्लू डी) सार्वजनिक बांधकाम (Alandi) विभागाचे काम चालू आहे. काही ठिकाणी पाण्याची पाईप लाईन चेंबर मधून गेलेली दिसून येत आहे. या रस्त्यावर जे काम चालू आहे ते काम लक्षपूर्वक पूर्ण करण्याचे गरजेचे आहे. या संदर्भातील वृत्त एमपीसी न्यूजने आज प्रसारित केली होती. या बातमीची तात्काळ दखल घेत सदर ठिकाणी पाहणी करण्यात आली.

बॉंड्री (सीमा) लाइनमध्ये (पायलेट चेंबर) हे चेंबर येत आहेत. लोकांच्या जागेत ते करू शकत नाही. तसेच हे पायलेट चेंबर आहेत. अलीकडील बाजूच्या नागरिकांना योग्य त्या अंतरावर असे चेंबर काढण्यात आले आहेत. भविष्यातील चेंबर लाईनसाठी ती व्यवस्था करण्यात आली आहे.

Alandi: पद्मावती रस्त्याची पाहणी करून घ्यावी सार्वजनिक बांधकाम विभागाला मुख्याधिकारी यांच्या सूचना

कारण भविष्यात रस्ता फोडून मेन चेंबरमध्ये लाईन घेऊ नये, ज्याने रस्ता दीर्घकाळ टिकावा. पायलेट चेंबरच्या सदर ठिकाणी भविष्याचा विचार करून चांगला गुणवत्ता असलेला डीआयके 7 पाईप टाकण्यात आलेला आहे. त्यामुळे त्या चेंबरमध्ये पाणी लिकेज व पाईप खराब (Alandi) होणे अशा समस्या येणार नाही. तसेच या ठिकाणी इतर केबल आहेत. व या ठिकाणी भविष्यातील नियोजन म्हणून पेव्हीन ब्लॉक बसवण्यात येणार आहेत. असे यावेळी सांगण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.