Alandi: पद्मावती रस्त्याची पाहणी करून घ्यावी सार्वजनिक बांधकाम विभागाला मुख्याधिकारी यांच्या सूचना

पद्मावती रस्त्यावरील पाण्याची पाईप लाईन चेंबर मधून क्रॉस

एमपीसी न्यूज – आळंदी येथील पदमावती रस्त्यावर (पी डब्लू डी)सार्वजनिक बांधकाम विभागाचे (Alandi)काम चालू आहे. काही ठिकाणी पाण्याची पाईप लाईन चेंबर मधून गेलेली दिसून येत आहे.या रस्त्यावर जे काम चालू आहे ते काम लक्षपूर्वक पूर्ण करण्याचे गरजेचे आहे.
नगरपालिकेच्या बांधकाम विभागाच्या व पाणीपुरवठा विभागाच्या संपर्कात राहून ,भविष्यात त्यातून काही प्रश्न निर्माण होणार नाही अश्या स्वरूपाने समन्वय साधून कामकाज करणे गरजेचे आहे.
सदर ठिकाणी नगरपरिषदे मार्फत सार्वजनिक विभागाच्या अभियंता यांना (Alandi)सदर ठिकाणची पाहणी करून घेणे बाबत सूचना केल्या आहेत. असे यावेळी मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी सांगितले.

 

 तसेच पद्मावती रस्त्यावर सदर ठिकाणी काम चालू आहे या फलकांचा अभाव दिसून येत आहे.अनेक नागरिक येथून ये जा करत असतात.ये जा करताना अपघात घडू नये यासाठी त्या फलकाची आवश्यकता दिसून येते.

 

https://www.youtube.com/watch?v=yiL5tv7B0bU&ab_channel=MPCNews

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.