Bundgarden : बंडगार्डन मेट्रो स्टेशन परिसरातून मेट्रो साहित्याची चोरी

एमपीसी न्यूज : पुण्यातील बंडगार्डन (Bundgarden) पोलीस स्टेशनच्या परिसरातून चोरीचा प्रकार उघडकीस आला आहे. रस्त्याच्या कडेला ठेवलेल्या लोखंडी कंटेनरमधून अज्ञात चोरट्याने एक लाख 42 रुपये किमतीचे साहित्य चोरून नेले आहे. कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अगमपाल सुरजित सिंग धूपर यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे.

Uttamnagar : इंस्टाग्रामवर ओळख अन् लग्नाच्या आमिषाने 15 वर्षीय मुलीवर बलात्कार

याप्रकरणी अधिक माहिती अशी, की बंडगार्डन मेट्रो स्टेशन (Bundgarden) या ठिकाणी रस्त्याच्या कडेला असणाऱ्या लोखंडी कंटेनर स्टोअरचे लॉक तोडून दहा इलेक्ट्रिक वायरचे बंडल, एक वेल्डिंग मशीन, तांब्याचे 16 लाइटनिंग अरेस्टर, दोन बटरफ्लाय, तांब्याचे पाईप्स, कटर मशीन, ड्रिल मशीन असा एकूण एक लाख 42 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.