Pune : अग्निशमन विभागाच्या तत्परतेमुळे गुरुवार पेठेतील आग आटोक्यात; मोठे नुकसान टळले

एमपीसी न्यूज : अग्निशमन विभागाच्या (Pune) तत्परतेमुळे गुरुवार पेठेत सजावट साहित्याला लागलेली आग शेजारच्या शाळेत न पोहोचल्याने मोठे नुकसान टळले आहे.

याबाबत अधिक माहिती देताना, अग्निशमन अधिकारी पंकज जगताप म्हणाले, की आज 1 जानेवारी रोजी रात्री सव्वाबाराच्या सुमारास गुरुवार पेठेतील पंचहौद येथे आग लागली. तेथील चर्च जवळील मोकळ्या मनपा जागेत पत्रा शेडमध्ये विविध प्रकारच्या सजावटीचे साहित्य ठेवले होते. अग्निशमन विभागाचा एक अग्निशमन बंब व एक टँकर घटनास्थळी पोहोचला.

आग मोठी होती व शेजारच्या एडवर्ड बॉइज स्कूलच्या (Pune) छतापर्यंत पोहोचली होती. ती आग तेथील संगणक कक्ष व ऑफिसमध्ये पोहोचली असती, तर मोठे नुकसान झाले असते. त्यापूर्वीच आग विझवण्यात आली. आग विझवायला 15 ते 20 मिनिटे लागली. त्यानंतर 30 मिनिटे कूलिंग करण्यासाठी लागले.

Bundgarden : बंडगार्डन मेट्रो स्टेशन परिसरातून मेट्रो साहित्याची चोरी

जगताप यांच्याबरोबर चालक अतुल मोहिते, गावडे, अजीज शेख, रियाज शेख व इतर कर्मचारी होते.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.