Thergaon news : थेरगाव महापालिकेच्या इमारतीचे प्लास्टर पडल्याने इमारत कमकुवत, मोठ्या अपघाताची शक्यता

एमपीसी न्यूज : थेरगाव मधील पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या (Thergaon news) इमारतीचे प्लास्टर पडल्याने इमारत कमकुवत झाली असल्याचे दिसत असून भविष्यात मोठ्या अपघाताची शक्यता आहे.

या इमारतीचे तीन ठिकाणचे प्लास्टर काल दुपारी 12.30 वा चे सुमारास खाली जमिनीवर पडले आहे. सुदैवाने यामध्ये कोणीही जखमी झालेले नाही. यातील तिसऱ्या मजल्यावरील प्लास्टर देखील पडले आहे.

याबाबत अधिक माहिती देताना, थेरगाव सोशल फाउंडेशनचे राहुल सरोदे म्हणाले की, ही इमारत सुमारे 30 वर्ष जुनी आहे. पूर्वी या इमारतीतमध्ये मनपाचा दवाखाना, वाचनालय व व्यायामशाळा होती. काही वर्षांपूर्वी येथील दवाखान्याचे दुसरीकडे स्थलांतर झाले आहे. सध्या या इमारतीत व्यायाम शाळा, ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र कार्यरत आहे.

Hockey Tournament : आंतरशालेय 14 वर्षांखालील हॉकी स्पर्धा 18 नोव्हेंबरपासून

येथील व्यायाम शाळेत पेहेलवानांसाठी मातीचा आखाडा आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर पेहेलवानांच्या स्पर्धा मॅट वर होत असतात. त्यामुळे थेरगाव सोशल फाउंडेशनने महानगरपालिकेकडे येथे मॅट व्यवस्था करावी अशी मागणी केली होती. त्यावेळेस मनपाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, (Thergaon news) इमारत जुनी झाल्याने त्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले आहे. जर स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये ही इमारत भक्कम असल्याचे कळाले तर येथे मॅट उभारण्यावर विचार केला जाईल. पण जर ही इमारत भक्कम नसल्याचे कळाले तर या इमारतीला पाडावे लागेल.

सरवदे म्हणाले की, या अपघातानंतर स्ट्रक्चरल ऑडिट रिपोर्ट संदर्भात विचारले असता त्यांनी काही सांगितले नाही. त्यामुळे जर इमारत भक्कम नसेल तर ती पाडावी अन्यथा इमारत दुरुस्त करून भविष्यातील होणारे अपघात टाळावेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.