Hockey Tournament : आंतरशालेय 14 वर्षांखालील हॉकी स्पर्धा 18 नोव्हेंबरपासून

एमपीसी न्यूज : लॉयला प्रशालेच्या माजी विद्यार्थी संघटना आणि लॉयल प्रशालेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 14 आणि 17 वर्षांखालील दुसऱ्या फादर शॉक आंतरशालेय हॉकी स्पर्धेचे (Hockey Tournament) आयोजन करण्यात आले आहे. नेहरुनगर येथील मेजर ध्यानचंद मैदानावर 18 नोव्हेंबरपासून ही स्पर्धा सुरु होणार आहे.

लॉयला प्रशालेचे संस्थापक फादर रेव्हरंड फादर शॉक यांच्या स्मरणार्थ या स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. ही स्पर्धा 2018 नंतर प्रथमच घेण्यात येत आहे.(Hockey Tournament) सुरुवातीला ही स्पर्धा फरक्त 14 वर्षांखालील गटासाठी होती. कोरोनाच्या संकटकाळानंतर पुन्हा या स्पर्धेला सुरुवात करताना 17 वर्षांखालील गटाचा नव्याने समावेश करण्यात आला आहे.

Chakan : किरकोळ कारणावरून एकाला मारहाण करून केले जखमी

हॉकी महाराष्ट्राच्या अधिपत्याखाली स्पर्धेचे आयोजन होईल. स्पर्धेत प्रवेश घेण्यासाठी 15 नोव्हेंबर ही अंतिम मुदत आहे. प्रवेशासाठी [email protected] या संपर्कस्थळावर (Hockey Tournament) संपर्क साधावा किंवा योगेश पागेदार (9822504273) श्रीधर कुलकर्णी (8237126771), श्रीधरन तंबा (9422338444) , विवेक काळे (9673992944) यांच्याशी संपर्क साधावा.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.