Thergaon News : संभाजी ब्रिगेडचे सतीश काळे राष्ट्रमाता जिजाऊ जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित

एमपीसीन्यूज : मराठा टायगर फोर्स सामाजिक संस्थेच्या वतीने संभाजी ब्रिगेडचे सतीश काळे यांना राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेब जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांना मराठा टायगर फोर्स सामाजिक संस्थेच्या वतीने पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

काळे यांचे पंधरा वर्षांपासूनचे केलेले नि:स्वार्थी सामाजिक योगदान खूप मोठे आहे. यामध्ये गेल्या दहा वर्षांपासून संभाजी बिडीचे नाव बदलण्यासाठी अनेक शिवप्रेमीं संघटनांसह मोठा लढा उभा करून अनेक आंदोलने केली होती. या लढ्याला अखेर यश येवून यावर्षीच संभाजी बिडीचे नाव बदलून ‘साबळे बिडी’ असे नामकरण करण्यात आलेले आहे.

तसेच मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी अनेक वेळा उपोषणे, धरणे, रस्ता रोको आंदोलने तसेच 2009  सालचे किल्ले शिवनेरीवरील आंदोलन यासारखे अनेक आक्रमक आंदोलने काळे केली आहेत. यासाठी काळे यांना करावासही भोगावा लागलेला आहे.

शेतकऱ्यांच्या दुधाला अधिक भाव मिळावा तसेच शेतक-यांच्या शेती मालाला योग्य हमीभाव मिळावा यासाठीही मुंडन आंदोलनासह अनेक आंदोलने केली आहेत.

तसेच बहुजन महापुरुषांच्या अस्मितेसाठी अनेक आक्रमक आंदोलने केली आहेत. या आंदोलनाचाच एक भाग असलेला छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी केल्याप्रकरणी आर्ट ऑफ लिव्हिंग चे श्री श्री रविशंकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, या मागणीसाठी काळे गेल्या एक वर्षापासून शासनाकडे पत्रव्यवहार तसेच संविधानीक मार्गाने आंदोलने करून पाठपुरावा करत आहेत. या लढ्याला ही यश मिळेल, असा निर्धार काळे यांनी व्यक्त केला आहे.

या कार्याची दखल घेत मराठा टायगर फोर्स संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संदीप लहाने पाटील यांनी अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय सरचिटणीस राजेंद्र कोंढरे यांच्या हस्ते संभाजी ब्रिगेडचे सतीश काळे यांना राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेब समाज गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

यावेळी संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक संतोष शिंदे, छावा संघटनेचे प्रमुख धनंजय जाधव प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.