Wakad : टीडीआर प्रकरणी संभाजी ब्रिगेडच्या आंदोलनाला महिना लोटला; चौकशी बाबत प्रशासनाची उदासीनता

एमपीसी न्यूज – वाकड येथील (Wakad) कथित टीडीआरमध्ये गैरव्यवहार करण्यासाठी अग्रेसर राहिलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नगरचना विभागाचे उपसंचालक प्रसाद गायकवाड व इतर दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी, या मागणीसाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीने साखळी उपोषण सुरु केले आहे. त्याला एक महिना उलटूनही चौकशी बाबत प्रशासनाची उदासीनता दिसत आहे.अधिकाऱ्यावर कारवाई करण्याबाबत महापालिका प्रशासनाच्या डोळयांना झापडे आले असल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष सतीश काळे यांनी प्रसिद्धीपत्रकात केला.

वाकडमधील आरक्षित भूखंड खासगी विकसकास विकसित करण्यासाठी देऊन शासकीय नियमांची पायमल्ली करण्यात आली,यामध्ये दीड हजार कोटी रुपयांचा टीडीआर घोटाळा झाल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष सतीश काळे यांनी केला होता. कथित टीडीआर घोटाळ्याप्रकरणी मुख्य सूत्रधार व इतर दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी, यासाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीने महापालिका प्रवेशद्वारावर सहा फेब्रुवारी पासून बेमुदत साखळी उपोषण सुरु आहे.

Pune: महाशिवरात्री निमित्त येरवडा वाहतूक विभागांतर्गत वाहतूकीत बदल

या आंदोलनात शहराध्यक्ष सतिश काळे यांच्या नेतृत्वात पुणे जिल्हा अध्यक्ष गणेश दहिभाते,कार्याध्यक्ष रविंद्र चव्हाण,उपाध्यक्ष वैभव जाधव, सचिव रावसाहेब गंगाधरे, संघटक वसंत पाटील,मावळ तालुका अध्यक्ष (Wakad) आदिनाथ मालपोटे,संतोष शिंदे,अभिषेक गायकवाड आदी आंदोलनात सहभागी आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.