Pune: महाशिवरात्री निमित्त येरवडा वाहतूक विभागांतर्गत वाहतूकीत बदल

एमपीसी न्यूज – महाशिवरात्री निमित्त तारकेश्वर मंदिर येथे मोठया प्रमाणात (Pune)भाविक देवदर्शनासाठी येत असल्याने पुणे शहरात वाहतुक सुरक्षित व सुरळीतपणे होण्या करीता पुण्यातील येरवडा वाहतूक विभागांतर्गत उद्या (शुक्रवारी) वाहतूकीत बदल करण्यात आला आहे, अशी माहिती वाहतूक पोलीस उपायुक्त रोहीदास पवार यांनी पत्रकाद्वारे जाहिर केले आहे.

त्यानुसार शहरातील पर्णकुटी चौक येथील वाहतुकीमध्ये (Pune)आवश्यकते प्रमाणे तात्पुरते स्वरुपात खालील प्रमाणे बदल करण्यात येत आहे.

Pune-Amaravati Train : पुणे ते अमरावती दरम्यान आठवड्यातून दोन रेल्वे

• कोरेगाव पार्क बंडगार्डन कडुन येणारी वाहतुक बंद करण्यात येत आहे.

पर्यायी मार्ग:

• पुण्या कडुन नगर रोड एअरपोर्ट कडे जाणारी वाहनांना तारकेश्वर चौकातून डावीकडे वळून शादलबाबा चौकातून उजवीकडे वळून आंबेडकर चौक येथून उजवीकडे वळून नगररोड व एअरपोर्ट कडे जातील.

• संगमवाडी कडुन कोरेगाव पार्क व नगर रोडकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात येत आहे.

पर्यायी मार्ग:

• संगमवाडी कडुन येणारी वाहतुक ही नगर रोड व कोरेगाव पार्क कडे जाणारी वाहने ही शादलबाबा चौकातून सरक आंबेडकर चौकातून सरळ नगर रोड व उजवीकडे वळून गुंजन चौकातून उजवीकडे वळुन पर्णकुटी चौकातून कोरेगाव पार्ककडे जातील.

• चंद्रमा चौकाकडुन नगर रोडकडे व कोरेगाव पार्ककडे येणारी वाहतूक बंद करण्यात येत आहे.

पर्यायी मार्ग:-
• खडकीकडून येणारी वाहने डी चंद्रमा चौकातुन नगररोड किंवा फोरेगाव पार्क या ठिकाणी जाणारी वाहने ही चंद्रमा चौकातुन डावीकडे वळून आळंदी जंक्शन, सरळ आंबेडकर चौकातुन, सरळ गोल्फ क्लब चौक, सरळ नगर रोड व कोरेगाव पार्क करे जाणारी वाहने ही गुंजन चौकातून उजवीकडे वळुन पर्णकुटी चौकातून कोरेगाव पार्ककडे जातील.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.