Thergaon : आर्थिक व्यवहाराच्या कारणावरून तरुणास बेदम मारहाण

एमपीसी न्यूज – आर्थिक व्यवहाराच्या कारणावरून  (Thergaon) एका तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली. ही घटना गुरुवारी (दि. 24) रात्री गणेशनगर, थेरगाव येथे घडली.

वेदांग प्रमोद नाईक (वय 21, रा. थेरगाव) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार विकास मोहिते याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विकास याने फिर्यादी यांना पैसे दिले आहेत. ते पैसे मागण्यासाठी आरोपी फिर्यादी यांच्या घरी आला. त्याने घरात येऊन पैशांची मागणी केली.

Dighi : टॉवरमध्ये बसवलेले साहित्य चोरीला

मात्र आता आपल्याकडे पैसे नाहीत, असे फिर्यादी यांनी (Thergaon) सांगितले. त्यावरून आरोपीने फिर्यादी यांना धक्काबुक्की करत हातातील कड्याने फिर्यादी यांना मारून जखमी केले. ‘तू जर मला माझे पैसे दिले नाहीस तर तुला मी परत मारीन’ अशी आरोपीने धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.