Hinjawadi crime : प्रेयसीने दुर्लक्ष केले म्हणून धमकी देत केली बदनामी

एमपीसी न्यूज – प्रेयसीने दुर्लक्ष केले म्हणून प्रियकराने प्रेयसीच्या घरच्यांना व तिला धमकी दिली. तसेच तिची इतर मित्रमैत्रीणीत बदनामी  केली. (Hinjawadi crime) हा प्रकार 2021 पासून ते 3 ऑक्टोबर 2022 या कालावधीत म्हाळुंगे येथे घडला आहे. 19 वर्षीय पीडितेने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून मोतीलाल चव्हाण (वय 21 रा.हैद्राबाद) याच्यावर हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Dehugaon : कोयत्याचा धाक दाखवून रिक्षाचालकाला लुटले

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी याची इन्स्टाग्रामवरून ओळख झाली.मैत्री होऊन दोघात प्रेम झाले. पुढे फिर्यादीने कॉलेजमध्ये अडमिशन घेतले.(Hinjawadi crime) त्यामुळे फिर्यादी यांचे आरोपीकडे दुर्लक्ष झाले व त्यांचे भेटणे-बोलणे झाले नाही. याचाच राग आल्याने आरोपीने फिर्यादीला रस्त्यात आडवून शिवीगाळ केली तसेच त्याने दिलेला मोबाईल तो घेऊन गेला. तसेच फिर्यादीच्या आई वडिलांना फोनवरून तुमची मुलगी कॉलेजच्या गेटमध्ये कशी जाते तेच बघतो,तिला मारूनच टाकतो अशी धमकी दिली तसेच फिर्दीच्या मित्र-मैत्रिणींना फोन करून फिर्यादीची बदनामी केली. तसेच इच्छा नसताना जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. यावरून हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.