Dehugaon : कोयत्याचा धाक दाखवून रिक्षाचालकाला लुटले

एमपीसी न्यूज – गळ्याला कोयता (Dehugaon) लावून चोरट्यांनी एक रिक्षा चालकाला लुटले आहे. हा प्रकार शुक्रवारी (दि.15) रात्री साडे दहा वाजता विठ्ठलवाडी बसस्टॉप जवळ घडला.

याप्रकरणी ज्योतीराम बबन सकपाळ (वय 34, रा.देहुगाव) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून देहूरोड पोलिसांनी दोन अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Dehuroad : देहूरोड येथून पाकीट माराला अटक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांची रिक्षा घेऊन (Dehugaon) जात असताना आरोपींनी त्यांना अडवले. यावेळी त्यातील एका आरोपीने फिर्यादीला पट्टा काढून त्याचा दम दिला तर दुसऱ्या आरोपीने थेट गळ्याला कोयता लावून फिर्यादीच्या खिश्यातील 6 हजार रुपयांचा मोबाईल चोरून नेला. यावरून देहूरोड पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.